आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा भाऊ रडायचा थांबत नव्हता, मग मोठ्या बहिणीने कारच्या सीट बेल्टनेच आवळला त्याचा गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- अमेरिकेच्या टेक्सासमध्ये 1 वर्षाच्या बाळाच्या हत्येची भयंकर घटना समोर आली आहे. ही हत्या इतर कोणी नाही, तर त्याच्या 6 वर्षांच्या बहिणीने केल्याचे समोर येताच सर्वांना धक्का बसला. पण अवघी 6 वर्षांची चिमुरडी एवढे भयंकर कृत्य कसे काय करू शकते, हा प्रश्न सर्वांच्याच मनात आला. मग पोलिसांनी जे सांगितले ते हृदय पिळवटून टाकणारे होते...

 

माझा भाऊ खूप रडत होता...

- ही घटना ह्युस्टन परिसरातील एका पार्किंग एरियात घडली. तेथे ती मुलगी तिचा भाऊ आणि वडिलांसोबत आली होती. 

 

- मुलीने सांगितले की, त्यांच्या वडिलांनी तिला आणि तिच्या भावाला कारमध्ये सोडले आणि काही सामान घेण्यासाठी बाहेर गेले.

 

- त्यानंतर तिचा भाऊ मोठमोठ्याने रडू लागला. खूप वेळ रडूनही तो शांत होत नव्हता, त्यानंतर त्या मुलीला राग अनावर झाला आणि तिने त्या बाळाला कारच्या सीट बेल्टने बांधले. त्यामुळे त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

 

वडिलांवर हत्येचा आणि चाइल्ड अब्युजचा गुन्हा दाखल


- मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी त्या मुलांचे वडील अॅड्रियन डेशुनला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा व मुलांचा जीव धोक्यात घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अॅड्रियन या घटनेबाबत स्पष्टिकरण देताना म्हणाला की, जेव्हा त्याने मुलांना कारमध्ये सोडले तेव्हा त्याने कारची एसी सुरू ठेवली होती, त्यासोबतच मुव्ही लावली आणि मुलांना स्नॅक्स पण दिले होते. त्यानंतर 30-40 मिनीटानंतर वापस आलो.

 

- पण पोलिसांना तपासात कळाले की, जवळ-जवळ दिड तासानंतर तो वापस आला. त्याने पोलिसांना सांगितले की, जेव्हा मी वापस आलो तेव्हा माझी मुलगी रडु लागली. ती म्हणाली तिने काहीतरी चुक केली आहे. तेव्हा मी पाहीले की, माझ्या एका वर्षाच्या मुलाची मान मागच्या सीट बेल्टमध्ये अडकली आहे. तात्काळ मी पॅरामेडिक्टला फोन केला पण तोपर्यंत त्याचा जीव गेलेला होता. 

 

मुलीने सांगितली पुर्ण घटना
- मुलगी घाबरलेली होती त्यामुळे सुरूवातीला ती कोणाशीच बोलत नव्हती, पण नंतर तिने हे कृत्य केल्याचे कबुल केले. ती म्हणाली- डॅड गेल्यावर आम्ही खेळत होतो. नंतर जेव्हा मी खेळने बंद केले तेव्हा तो जोराने रडू लागला, त्यामुळे मला राग आला. त्याला झोपी घालण्याचा विचार केला, आणि त्याला सीट बेल्टने बांधले आणि तो झोपी गेला. पोलिस म्हणाले ती मुलगी जी गोष्ट सांगत आहे, ती पुर्णपण खरी आहे. कारण तिला फिक्शन आणि सत्यतेतील फरक कळत नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...