राजस्थान / टोंकमध्ये 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; घरापासून अवघ्या 300 मीटर दूर आढळला मृतदेह

  • शनिवारपासून बेपत्ता होती चिमुकली, स्कूल यूनिफॉर्मच्या बेल्टने गळा आवळला
  • घटनास्थालवर मिळाल्या दारुच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले कपडे

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2019 11:10:32 AM IST

टोंक(राजस्थान)- टोंकमध्ये शनिवारपासून बेपत्ता असलेल्या 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी चिमुकलीचा मृतदेह घरापासून अवघ्या 300 मीटर दूर झाडांमध्ये आढळला. घटनास्थळावर दारुच्या बाटल्या, कचोरी आणि रक्ताने माखलेले कपडे आढळले. चिमुकलीच्या स्कूल यूनिफॉर्मच्या बेल्टने तिचा गळा आवळण्यात आला.


नराधमांनी मुलीच्या स्कुटल युनिफॉर्मच्या बेल्टने तिचा गळा आवळून जीव घेतला. तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. पोलिसांना गावातील व्यक्तीवरच संशय आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरात लवकर आरोपींना पकडले जाईल असे, एसपी आदर्श सिद्धू यांनी सांगितले.

X
COMMENT