आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षीय मुलाने आपल्या बर्थडेवर दिली पिझ्झा पार्टी, वर्गातील 32 मुलांना बोलावले, पण कोणीच आले नाही, तेव्हा आईने केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क/ वॉशिंग्टन - मुले आपल्या वाढदिवसाची आतुरतेने प्रतीक्षा पाहतात, अमेरिकेच्या अॅरिझोनामध्ये राहणाऱ्या 6 वर्षीय टेडीलाही आपल्या वाढदिवसाची प्रतीक्षा होती, जेव्हा बर्थडे आला तेव्हा त्याने पूर्ण वर्गातील 32 मुलांना इन्व्हाइट केले. टेडीची आई सिली मॅजिनीने शहरातील एका रेस्टॉरेंटमध्ये पार्टी दिली, पण एकही मित्र या पार्टीला आला नाही.

 

निरागस मुलाचा नाराज फोटो व्हायरल

टेडी सर्वांची वाट पाहत होता, एकट्याने त्याने एक पिझ्झाही खाल्ला. परंतु खूप वाट पाहूनही कोणीही आले नाही म्हणून तो नाराज झाला. तो जेवणाच्या टेबलवर एकटा बसलेला होता. यादरम्यान त्याची आई सिली मैजिनीने त्याचा फोटो क्लिक करून तो एक रिपोर्टर निक विनला पाठवला. त्यांनी हा फोओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला. हा फोटो ताबडतोब व्हायरल झाला आणि लोकांनी कॉमेंट्स करणे सुरू केले. काही जणांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, काहींनी अनोखे गिफ्ट दिले. अनेक जण टैडीला खुश करण्याच्या आयडिया देऊ लागले.

 

शाळेत पार्टी देणार रेस्टॉरंट
दुसरीकडे, पीटर पाइपर पिझ्झाचे मार्केटिंग को-ऑर्डिनेटर जेनिफर क्रेब्स म्हणाल्या की रेस्तराँ टेडीच्या शाळेत पार्टी करण्याचा विचार करत आहे आणि यात फुगे, केक, गिफ्ट आणि पिझ्झाही असेल. टेडीच्या आईने तिचा एक व्हिडिओ कॅप्शनसोबत शेअर केला. ज्यात लिहिले होते- तो आधीच हसायला लागलाय.

 

का नाही आले मित्र?
टेडीच्या आईच्या मते, त्यांना त्याचे मित्र का आले नाहीत हे कळत नव्हते. परंतु शनिवारी शाळेच्या हेलोवीन कार्निव्हलमध्ये मुले कुटुंबीयांसोबत गेलेले होते, दुसऱ्या दिवशी रविवार होता- याच दिवशी टेडीचा बर्थडे होता. पाऊसही होत होता, यामुळेच बहुधा मुले येऊ शकली नाहीत. त्यांनी मुलांसाठी खास रिटर्न गिफ्टही तयार केलेले होते. ते म्हणाले की, पुढच्या वर्षी त्या पार्टी देण्याऐवजी टेडीला ट्रिपवर नेतील. 

 

 

बातम्या आणखी आहेत...