Maharashtra Special / गणपती विसर्जनसाठी गेलेले 6 तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले, शहादा तालुक्यातील धक्कादायक घटना

तरुणांच्या जाण्याने गावातील नागरिकांना धक्का बसला आहे

Sep 06,2019 06:18:22 PM IST

नंदुरबार- गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू घडल्याची घटना जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछील गावात घडली आहे. विसर्जनासाठी गेले असताना तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व तरुणांचे मृतदेह मिळाले असून म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.


सध्या राज्यात सर्वत्र गणपती आगमनाची धामधुम आहे. पण काही ठिकाणी 5 दिवसांचा गणपती बसतो, आणि याच गणपतीचे विसर्जन सध्या सुरू आहे. जिल्ह्यातही पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात होते. त्यामुळे गावातील चित्रकथे कुटुंबातील मुले बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले होते. यावेळी विसर्जनासाठी बाप्पाला पाण्यात घेऊन गेले, मात्र अचानक खोल पाणी असल्याने सर्व मुले बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये कैलास संजय चित्रकथे, सचिन सुरेश चित्रकथे, रविंद्र शंकर चित्रकथे, विशाल मंगल चित्रकथे, दीपक सुरेश चित्रकथे आणि सागर आप्पा चित्रकथे या तरुणांचा समावेश आहे. दरम्यान, तरुणांच्या या अकस्मात मृत्यूमुळे गावातील नागरिकांना सुन्न केले आहे.

X