आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार मतदारसंघांत आचारसंहिता भंगाचे ६० गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांत आचारसंहितेच्या काळात अनधिकृतपणे सभा घेणे, रॅली काढणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे आदी कारणांवरून ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दि.२१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी प्रचार करण्याच्या कारणावरून चार मतदारसंघांत ११ जणांवर मालमत्तेचेविद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. अनधिकृतपणे सभा घेणे व रॅली काढण्यावरून ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी, जिंतूर व गंगाखेड या तिन्ही मतदारसंघांत प्रत्येकी तीन याप्रमाणे ९ गुन्हे दाखल झाले आहेत. मोटारवाहन अधिनियमानुसार २९ गुन्हे दाखल झाले असून सर्वाधिक गुन्हे गंगाखेडमध्ये १७, तर सर्वात कमी पाथरीमध्ये २ दाखल झाले आहेत. 

पोलिस अधिनियमानुसार जिंतूरमध्येच पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तर इतर सहा गुन्हे याप्रमाणे एकूण ६० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक गंगाखेडमधील २९ गुन्ह्यांचा समावेश आहे. तर, सर्वात कमी गुन्हे पाथरीत केवळ तीन दाखल झाले आहेत. 
 

पाच लाखांचे साहित्य जप्त
निवडणूक विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत जिंतूर मतदारसंघात एक बुलेट व तीन मोटारसायकलींसह टी-शर्ट, क्रिकेट किट व मोबाइल असे साहित्यही जप्त करण्यात आले. परभणीमध्ये पक्षाचे चिन्ह असलेले ९० घड्याळ जप्त करण्यात आले, तर गंगाखेडमध्ये ५० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.