जानेवारीत इक्विटी म्युच्युअल / जानेवारीत इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत 60% घट 

Feb 13,2019 09:15:00 AM IST

नवी दिल्ली- शेअर बाजारातील चढ-उतार आणि राजकीय अनिश्चिततेत इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये जानेवारीदरम्यान गुंतवणुकीत ६० टक्क्यांची घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात यामध्ये ६,१५८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये १५,३९० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. याव्यतिरिक्त इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये भांडवलाच्या प्रवाहात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण दिसून आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा आकडा १२,६२२ कोटी रुपये होता. जानेवारीतील ताजा आकडा यापेक्षा ६७ टक्के कमी आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील अव्वल संस्था एम्फीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

म्युच्युअल फंड कंपन्यांनुसार शेअर बाजारामध्ये चढ-उतार, राजकीय अनिश्चितता आणि निर्देशांक दबावात राहिल्याने काही गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहणे पसंत केले आहे. यामुळे ही घसरण नोंदवण्यात आली आहे.

एम्फीनुसार जानेवारीमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांचा अॅसेट बेस १.७८% वरून कमी होऊन ७.७३ लाख कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी जानेवारीमध्ये हा ७.८७ लाख कोटी रुपये होता. पूर्ण म्युच्युअल फंड उद्योगात जानेवारीदरम्यान ६५,४३९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मागील वर्षी जानेवारीमध्ये १.०६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा ही ३८ टक्के कमी आहे. म्युच्युअल फंड कंपन्या जानेवारीमध्ये २३.४ लाख कोटी रुपयांच्या अॅसेटचे व्यवस्थापन करत होत्या. मागील वर्षी जानेवारीमधील २२.४१ लाख कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये हे ४.४२% जास्त आहे.

X