आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेवर ६० वर्षीय वृद्धाकडून बलात्कार; नशिराबाद येथील घटना; संशयिताला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी- नशिराबाद येथील ११ वर्षीय बालिकेवर ६० वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना साेमवारी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, पीडित मुलीचे वडील सायंकाळी शेतातून घरी अाल्यावर ही घटना उघडकीस अाली. नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला. 


नशिराबाद येथील ११ वर्षीय बालिका दुपारी चार वाजता शौचास गेली हाेती. या वेळी पीडित बालिकेच्या परिसरात राहणाऱ्या तुकाराम रंगमले (वय ६०) या वृद्धाने रस्त्यात अडवून वीटभट्टीजवळ नेत तिच्यावर बलात्कार केला. बालिकेच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून तिचे वडील शेती व्यवसाय करतात. दरम्यान, सायंकाळी मुलीचे वडील शेतातून घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी रात्री १०.३० वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात अाली अाहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. बलात्कारी रंगमले याला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. तर पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीकरिता रात्री ११.४५ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणले. 

 

बातम्या आणखी आहेत...