Home | International | China | 60 year old woman gets plastic surgery to look 20 to escape creditors arrested

ज्येष्ठ महिलेने काढले 30 कोटींचे कर्ज, चकवा देण्यासाठी केली Plastic Surgery; तरीही अटक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 12, 2018, 03:21 PM IST

6 महिन्यांपूर्वी तिला कोर्टाने कर्ज परत फेडण्याचे आदेश दिले. तेव्हापासूनच ती बेपत्ता होती.

  • 60 year old woman gets plastic surgery to look 20 to escape creditors arrested

    बीजिंग - चीनच्या हुबेई प्रांतातून कर्जबुडवेगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. झू नाव असलेल्या या 60 वर्षीय महिलेने तब्बल 30 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. त्यापैकी सर्वाधिक कर्ज तिने कापड दुकान चालवताना घेतले होते. पोलिस आणि कर्जदारांना चकवा देण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी करून आपला चेहरा बदलला होता. 60 वर्षांची असतानाही तिने आपला अवतार 20 वर्षीय तरुणीसारखा केला होता. पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा आपण आर्थिक दृष्ट्या खूप कमकुवत आहोत आणि फक्त बहिणीच्या जीवावर जगत आहोत असे सोंग तिने धरले होते. परंतु, तपासात तिच्याकडे असलेली संपत्ती पाहून पोलिस सुद्धा हैराण झाले.


    20 लाख एंट्री फी असलेल्या क्लबची अधिकृत सदस्य
    > पोलिसांनी केलेल्या तपासात ती प्रत्यक्षात उच्चभ्रू लाइफ जगताना रोज लाखो रुपये खर्च करत असल्याचे समोर आले आहे. ती ज्या ठिकाणी राहते तेथील एका मोठ्या क्लबची फक्त एंट्री फी 20 लाख रुपये आहे. त्याच क्लबची झू अधिकृत सदस्य आहे. तिने कर्जाच्या रकमेतून घर, प्रॉपर्टी जमीन आणि महागड्या कार खरेदी केल्या आहेत. या सर्वच गोष्टी तिने आपल्या नाही, तर बहिणीच्या नावे घेतल्या. 6 महिन्यांपूर्वी तिला कोर्टाने कर्ज परत फेडण्याचे आदेश दिले. तेव्हापासूनच ती बेपत्ता होती.
    > पोलिसांनी आपल्या तपासात झोऊचे काही सोशल मीडिया अकाउंट सुद्धा खांगाळून पाहिले. त्यामध्ये तिने आपले वर्ल्ड टूर आणि एक्सक्लूझिव क्लब मेंबर्ससह फिरतानाचे फोटो दिसून आले आहेत. तिने 2016 मध्ये आपल्या क्रेडिट कार्डवर तब्बल 4 कोटी रुपयांचे बिल केले. हे बिल तिने अद्यापही भरलेले नाही. झोऊला स्थानिक कोर्टाने तिच्या कृत्यांसाठी 1 वर्ष आणि 4 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच तिची संपूर्ण संपत्ती सील करण्याचे आदेश दिले.

Trending