आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 600 Crores Of Immediate Help From The Central Government To The Farmers Of The State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 600 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता केंद्र सरकारने ६०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.


प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना रूपाला म्हणाले, महाराष्ट्र सरकारने केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारने या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवले आहे. या पथकाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार केंद्र सरकारने ६०० कोटी रुपयांची तातडीची मदत देण्याचे निश्चित केले आहे. मदतीचा हा आकडा अंतिम नाही. नुकसानीचा एकूण अंदाज आल्यानंतर आणखी मदतीबाबत निर्णय घेतला जाईल.


महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्येही अनेक भागांत पाऊस झाल्याने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीची अंतिम आकडेवारी लवकरच अपेक्षित आहे. राज्याकडून ही माहिती मागवली जात आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी या योजनेबाबत विचारण्यात आलेल्या आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना रूपाला यांनी सांगितले की, महाराष्ट्रासाठी या योजनेअंतर्गत ३,१०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

केंद्रीय पथक मराठवाड्यात


खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी मराठवाडा भागात दाखल झाले असून पहिल्या दिवशी या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड या तालुक्यांत पाहणी केली. शनिवारी हे पथक बदनापूर, भोकरदन आणि जाफराबादला (जि. जालना) भेट देईल.
 

बातम्या आणखी आहेत...