Home | Business | Business Special | 600 greenhouses built in Egypt with the help of Chinese technology,

चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने इजिप्तमध्ये उभारली ६०० हरितगृहे, वाळवंटातही घेतले फळे-भाज्यांचे उत्पादन

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 14, 2019, 10:50 AM IST

हरितगृह निर्मितीसाठी लागल्या ५.५ लाख टन वस्तू

  • 600 greenhouses built in Egypt with the help of Chinese technology,

    शरकिया (इजिप्त) - चीनच्या हरितगृह प्रणालीने सध्या इजिप्तमध्ये आधुनिक शेती करण्यात येत आहे. तेथे ६०० हरितगृहे (ग्रीनहाऊस) तयार करून १,००० हेक्टर वाळवंटावर फळ-भाज्या पिकवल्या जात आहेत. स्थानिक बाजारात पुरवठ्यानंतर सुमारे १५% पिकांची निर्यात सुरू आहे. चीन आणि इजिप्तदरम्यान मे २०१७ मध्ये हरितगृहांसाठी २,८०० कोटींचा करार झाला होता. उत्तर-पूर्व इजिप्तमध्ये अशाच एका प्रकल्पावर काम सुरू आहे. येथे ३,९०० हेक्टर क्षेत्रावर २,३५० हरितगृहे उभारण्यात येत आहेत.

Trending