आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदीमुळे लुंगीचे ६००, साड्यांचे हजार माग बंद; मालेगावातील चित्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - शहरात तयार हाेणाऱ्या रंगीत साडी व लुंगी व्यवसायाला आर्थिक मंदीने घरघर लागली आहे. देशभरातील मुख्य बाजारपेठा काबीज करणारी ही दाेन्ही उत्पादने मागणीअभावी पडून आहेत. रमजान महिन्यापासून लुंगीचा मालच उचलला न गेल्याने सुमारे ६०० माग बंद झाले आहेत. रंगीत साडी उत्पादनाचीही हीच परिस्थिती असल्याने जवळपास हजार मागांची खडखडाट थांबून बेराेजगारीचे प्रमाण वाढले आहे. 
 
वर्षापूर्वी आठ हजार मागांवर साड्या तयार हाेत हाेत्या. आज मागांचे प्रमाण पाच हजारांवर येऊन पाेहाेचले आहे. लुंगी निर्मितीचे सेमी आॅटाे लूम १५०० वरून थेट ९०० वर आले आहेत. चार मिनार, सिल्व्हर किंग, बडा खान, हाजी काॅटन, मार्बल, डबल मिनार, सन्स काॅटन, गार्डन, गाइड, अलहदिया, शालिमार, चांदनी, अरमान, महाराष्ट्रा आदी ३० प्रकारांमध्ये  पाॅलिस्टर, कॅटन, मसराइज्ड लुंगी तयार हाेते. तिला महाराष्ट्रासह कर्नाटक, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये विशेष मागणी असते. सध्या मागणीच नसल्यामुळे तयार माल ७० दुकानांत पडून आहे. मराठवाडा व विदर्भाचा दुष्काळ तसेच काेल्हापूर व सांगलीच्या पूरस्थितीने तेथील मागणीच ठप्प आहे. 
माेनिका साडी कालबाह्य : सहावारी माेनिका पाॅलिस्टर साडीला सर्वाधिक मागणी हाेती. तिचे उत्पादन वर्षापासून बंद आहे. सुताच्या दरातील चढ-उताराने माेनिका साडीची निर्मिती घाट्याची ठरत असल्याने तिचे उत्पादन पूर्णत: बंद करण्यात आले आहे. सध्या काॅटन, मर्सराइज्ड व सिंथेटिक्समध्ये सात व नऊवारी साड्या तयार हाेत आहेत. 

कर्जबाजारी हाेण्याची वेळ
रंगीत साड्या माेठ्या प्रमाणावर पडून आहेत. घटलेली मागणी लक्षात घेऊन उत्पादन करत आहाेत. मंदीचे सावट कायम राहिल्यास साडी उत्पादकांना कर्जबाजारी हाेण्याची वेळ येणार आहे. - अन्वर अन्सारी, साडी उत्पादक

सध्या फक्त सहा तासांचे काम
इतर युनिट बंद करून केवळ १६ मागांवर लुंगी तयार करताे. दिवसाला फक्त सहा तास काम चालते. त्यामुळे कामगारांची संख्या कमी करावी लागली. सर्व लुंगी उत्पादक अशा बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. - अब्दुल लतीफ, लुंगी उत्पादक 


उत्पादन ३० % घट
ले
> साधारण वर्षापूर्वी साडीचे आठ हजार माग हाेते. यावर सरासरी दरराेज २४ हजारांच्या आसपास साड्या तयार हाेत हाेत्या. 
> आता केवळ पाच हजार माग राहिल्याने दिवसाला १५ ते १८ हजार साड्या तयार हाेतात. उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...