आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

600 वर्षे जुन्या मशीदीचे रोबोटच्या मदतीने 2 किमी दूर स्थलांतर; धरणाच्या बांधकामात येत असल्याने हलवले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकारा - तुर्कीतील हसनकैफ शहरात 600 वर्षांपासून असलेली मशीद रोबोटिक क्रेनच्या मदतीने 2 किमी दूर स्थलांतरित करण्यात आली आहे. सहा शतकांपासून सुरक्षित ठेवण्यात आलेल्या या मशीदीच्या प्राचीन भिंती तोडून त्यांचे तुकडे एक-एक करून वाहनांमध्ये भरण्यात आले. इयुबी मशीद ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी देशाचे चौथे सर्वात मोठे धरण बांधले जात आहे. या धरणाच्या बांधकामात येत असल्याने मशीद हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मशीद हलवली नसती तर धरणाच्या पाण्याचा बुडण्याचा धोका होता.


हसनकैफचे महापौर अब्दुलवहाप कुसेन यांनी सांगितले, की "पूराच्या पाण्याने ऐतिहासिक इमारतीला नुकसान होऊ नये यासाठी मशीद दुसरीकडे हलवण्यात आली आहे." हसनकैफ शहराला या मशीदीमुळे 1981 मध्ये ऐतिहासिक वारसा म्हणून संरक्षण मिळाले होते. येथे जवळपास 6 हजार गुफा आणि बाइझेंटाइन युगातील ऐतिहासिक किल्ला देखील आहे. 2500 टन वजन असलेल्या मशीदीचे भाग 300 चाकांच्या शक्तीशाली वाहनाच्या माध्यमातून न्यू कल्चरल पार्क फील्डमध्ये स्थापित करण्यात आले आहे. याच ठिकाणी या ऐतिहासिक वारसाचे पुनरुत्थान केले जात आहे.


युरोपियन बँकांनी दिला होता इशारा...
इतिहास तज्ज्ञांच्या मते, हसनकैफ शहर 9 घराण्यांचा साक्षीदार ठरला आहे. या शहराचा उल्लेख 4000 वर्षांपूर्वीच्या लेखांमध्ये सुद्धा मिळतो. धरणाचे बांधकाम करताना तुर्की सरकारने ऐतिहासिक मशीद हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हा युरोपियन बँकांनी सरकारला इशारा दिला होता. या स्थलांतराच्या कामात मशीदीच्या मूळ बांधकामाला नुकसान पोहोचल्यास किंवा पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कुठलेही युरोपियन बँक या देशाला कर्ज देणार नाही. सोबतच, धरण बांधण्याच्या कामाला सुद्धा अर्थसहाय्य केले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...