Home | International | Other Country | 600 years old tradition: 11 million liters of water spill in 4 days

६०० वर्षांची प्राचीन परंपरा : ४ दिवसांत ११ कोटी लिटर पाण्याचे शिंपण

वृत्तसंस्था | Update - Apr 14, 2019, 10:55 AM IST

यंदा जगभरातून ३० हजारांवर पर्यटक दाखल, गतवर्षी २७ हजार पर्यटक सहभागी होते

 • 600 years old tradition: 11 million liters of water spill in 4 days

  नॅपिता । म्यानमारचा पारंपरिक थिंगयान हा जल महोत्सव शनिवारपासून सुरू झाला. हा उत्सव १६ एप्रिलपर्यंत देशभरात साजरा केला जातो. १७ एप्रिलपासून येथे नूतन वर्ष (बौद्ध नववर्ष) प्रारंभ होते. वॉकिंग थिनयांग इव्हेंटमध्ये लोक शहरभरात भटकंती करतात आणि रस्त्याच्या कडेला मंडपातून लोक त्यांच्यावर पाण्याचे शिंपण करतात. यंदा उत्सवादरम्यान सुमारे ११ कोटी लिटर पाणी वापरले जाणार आहे. म्यानमारमध्ये १२ उत्सवांपैकी थिंगयानला जास्त मोठे मानले जाते. यात देशोदेशीचे पर्यटकही सहभागी होतात.

  ८ हजार सुरक्षा रक्षक, १००० हून जास्त वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी

  यांगून आरपीएफचे प्रमुख ला यीने सांगितले की, यंदा सुरक्षा व्यवस्थेत ८ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. वाहतूक विभागाने कर्नल थीन ऊ यांनी एक हजार जवान वाहतुकीचे नियंत्रण करत आहेत.

  पहिल्यांदाच यूएनचे अधिकारी व कुटुंबीयही उत्सव साजरा करणार

  चार दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्राचे अधिकारी व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले. यूएनच्या म्हणण्यानुसार सांस्कृतिक राजधानी मंडालेमध्ये आयोजित कार्यक्रमात लोक सहभागी होतील.

  भारतातून आलेल्या हिंदूंनी पर्वात रूपांतर केले
  थिंगयानदरम्यान परस्परांवर पाणी फेकले तर वर्षभरातील सर्व वाईट गोष्टींचे निर्मूलन होते, अशी म्यानमारमधील लोकांची श्रद्धा आहे. नूतन वर्षाची सुरुवात स्वच्छ मनाने व्हायला हवी, असा त्यामागील उद्देश आहे. सूर्य मेषमधून मीन राशीत प्रवेश करणारा हा कालखंड (एप्रिलमध्ये) या दरम्यान थिंगयान साजरा होताे.१३ व्या शतकापासून उत्सव साजरा होतो. भारतातून आलेल्या हिंदूंनी त्यास पर्व बनवले.

Trending