राज्यातील सव्वा कोटी / राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना 6 हजार तर अनुदानाचा लाभ; जाणून घ्या काय आहे योजना

विशेष प्रतिनिधी

Feb 02,2019 08:55:00 AM IST

नाशिक/मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला. त्याचा महाराष्ट्रातील १ कोटी १८ लाख ७१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. दुष्काळी संकट, पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' या योजनेतून केला आहे.

अशी आहे योजना
> अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६ हजार रुपये थेट अनुदान मिळेल. ५ एकरपर्यंत (२ हेक्टर) जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल
> २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत ही रक्कम देण्यात येईल. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे
> १ डिसेंबर २०१८ पासून लागू होईल. ३१ मार्चपर्यंत २ हजारांचा पहिला हप्ता

देशभरात : ८६.२१% शेतकऱ्यांना होणार फायदा
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना थेट ६ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान मिळणार आहे.

राजस्थान, मध्य प्रदेशातून घेतला धडा
शेतमालाचे कोसळलेले बाजारभाव आणि सततची नैसर्गिक आपत्ती यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या देशभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अद्याप निम्म्या पात्र शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यासह दिल्लीत शेतकऱ्यांचे मोर्चे धडकले. मध्य प्रदेेश, राजस्थान, छत्तीसगडमध्येही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपला सत्ता गमवावी लागली. यापासून धडा घेत मोदी सरकारने शेतकऱ्यांची थेट आर्थिक मदत देण्याची मागणी मान्य केली.

X
COMMENT