आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींच्या शिक्षणाचा संदेश घेऊन सहा हजार किमी स्केटिंग; उद्योजक राणा उप्पलपती यांचा अनोखा उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या सुरक्षेविषयीचा संदेश घेऊन विशाखापट्टणममधील उद्योजक राणा उप्पलपती यांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. हा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी ६ हजार किलोमीटर स्केटिंग करण्याचा निश्चय केला आहे. देशभरातील ग्रामीण भागातील सुमारे २५ हजार मुलींच्या शिक्षणासाठी निधी जमवण्याचा उप्पलपती यांचा उद्देश आहे. 


५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी त्यांनी दक्षिण भारतातील होसूर या शहरातून या मोहिमेचा प्रारंभ केला. दक्षिणेतील टुमकुरू, सिरा, चित्रदुर्ग, कर्नाटकातील हुबळी, बेळगाव ते महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे या शहरांमार्गे स्केटिंगने प्रवास करत ते बुधवारी मुंबईत पोहोचले. दरम्यान, पुण्यात त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. या वेळी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख उपस्थिती होती.   


९० दिवसांत भारताचा ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ साधण्याचा निश्चय  
राणा उप्पलपती यांनी ९० दिवसांत स्केटिंगच्या माध्यमातून देशाचा ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ (सुवर्ण चौकोन) साधण्याचा निश्चय केला आहे. यासाठी ते रोज सुमारे १०० किलोमीटर अंतरापर्यंत स्केटिंग करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध भागातील ३ हजार लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्यापर्यंत आपला संदेश पोहोचवला आहे.   

बातम्या आणखी आहेत...