आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये आढळून आलेले 6 हजार वर्ष जुने सांगाडे महाभारत काळाशी संबंधित? वैज्ञानिकही झाले चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझील - येथील एका शहरात खोदकामामध्ये वैज्ञानिकांना चकित करणारी गोष्ट आढळून आली आहे. ब्राझीलमधील सेंट कॅटरिनाजवळील एका भागात सहा हजार वर्षांपूर्वीचे सांगाडे आढळून आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही सांगाड्यांचे दात एकदम व्यवस्थित आहेत. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, या सांगाड्यांचा संबंध भारताशी आहे. या दाव्यामुळे असा अंदाज बांधण्यात येत आहे की, हे सांगाडे सहा हजार वर्षांपूर्वीचे असतील तर भारतामध्ये सहा हजार वर्षांपूर्वी महाभारत काळ होता.


समोर आल्या या गोष्टी... 
रिसर्च दरम्यान वैज्ञानिक आणि जवळपासच्या लोकांनी विविध कयास लावले. परंतु कार्बन डेटिंगनुसार हे सांगाडे 5850 वर्ष जुने आहेत. सनातन धर्मानुसार पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत घडले होते.


ते या भागात का आले?
- सांगाड्यांची कार्बन डेटिंग आणि शारीरिक बनावट पाहून एक्स्पर्टसने हे सांगाडे आशिया किंवा विशेषतः भारताशी संबंधित असू शकतात असे सांगितले. परंतु हे येथे का आणि कसे आले हे अजूनही एक कोडेच आहे. हे लोक एखाद्या गोष्टीच्या शोधामध्ये येथे असे असावेत असाही अंदाज लावण्यात येत आहे.


तीन वेगवेगळ्या एक्स्पर्टसने सांगितली एकच गोष्ट
- या रिसर्चमध्ये ब्राझीलचे बायोलॉजी एक्सपर्ट तसेच विविध इतिहासकार आणि पुरातत्त्व अधिकारीही सहभागी होते. या सर्वांनी या गोष्टीवर सहमती दर्शवली की, या सांगाड्यांच्या संबंध आशियातील देशाशी आहे. इतिहासकार आता पाच हजार वर्षांपूर्वी जगात कोणती सभ्यता होती याचा अभ्यास करत आहेत. यावरून हे लोक नेमके कोण होते हे समजू शकेल.

बातम्या आणखी आहेत...