Home | Maharashtra | Mumbai | 60000 stolen from tv producer ekta kapoor's purse

एकता कपूरच्या पर्समधून रोकड लंपास..पोलिसांनी पाच जणांची कसून केली चौकशी, एकही सुगावा नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 06:19 PM IST

चोरांनी दीड लाखांपैकी चोरले फक्त 60 हजार रुपये..

 • 60000 stolen from tv producer ekta kapoor's purse

  मुंबई- टीव्ही प्रोडयुसर एकता कपूरच्या पर्समधून अज्ञात चोरटयांनी शनिवारी (1 डिसेंबर) 60 हजार रुपयांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी एकताने जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनीही आतापर्यंत पाच संशयितांची कसून चौकशी केली. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.

  एकताच्या पर्समध्ये जवळपास दीड लाख रुपये होते. त्यापैकी अज्ञांत चोरट्यांनी 60 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी कलम 329 अन्वये तक्रार दाखल केली आहे.

  अशी समोर आली चोरी...
  एकताने सांगितले, तिने बँकेमधून दीड लाख रुपये काढून आणले होते. मात्र, घरी पोहोचल्यानंतर तिला पर्स वजनाने हलकी लागली. म्हणून तिने पर्समधील पैसे मोजले असता पर्समधून 60 हजार रुपये गायब असल्याचे समोर आलेे.

  घरातील नोकरांवर संशय..
  एसीपी दत्तात्रय बारगुडे यांनी सांगितले की, एकताने तक्रार नोंदवताना काही संशयित व्यक्तींची नावे सांगितली आहेत. ते सर्व तिच्या घरातील नोकर आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. मात्र, अजूनही चोरीसंबंधी काहीही ठोस सुगावा लागलेला नाही. त्या दिवशी घरात कोण आले, कोण घरातून बाहेर गेले, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी एकताच्या घरातील cctv कॅमेराचे सर्व फुटेज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Trending