आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्लब ६२ कोटींत बनला ‘सायरा नरसिम्हा रेड्डी’चा सेट, १२ हजार लोकांनी एकत्र केले शूटिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिणेचा प्रसिद्ध सुपरस्टार चिरंजीवी आगामी चित्रपट ‘सायरा नरसिम्हा रेड्डी’मधून तेलुगु सिनेमात पुनरागमन करणार आहे. यात त्याच्या मेंटरच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेेत. हा चित्रपट तेलुगु सिनेमाचा मोठ्या बजेटचा आणि ढीगभर कलाकार असलेला चित्रपट आहे. यात सर्वात मोठा खर्च चित्रपटाचा सेट आणि कलाकारांच्या कपड्यांवर करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या सेटचे बजेट ६२ काेटी रुपये आहे. यासाठी एकूण ४२ सेट बनवण्यात आले आहेत यापैकी १७ मोठे सेट आहेत. विशेष म्हणजेे सेटवर एका दिवसात कलाकार, तंत्रज्ञ, संपादक, स्पाॅट बॉय आणि ज्युनियर आर्टिस्ट आदी मिळून १२ हजार लोकांनी काम केले.
 
 

असा तयार झाला सेट
 

> पुस्तकांचा घेतला आधार
चित्रपटाची कथा फोटो आणि व्हिडिओ नसलेल्या काळातील आहे. त्यामुळे सेट डिझाइन करताना डिझायनर्सला पुस्तकांचा आधार घ्यावा लागला. 
 

> दोन प्रकारचे बनलेत सर्व सेट
चित्रपटासाठी बनवण्यात आलेले एकूण ४२ सेट दोन वेगवेगळ्या थीमवर बनवण्यात आले आहेत. काही सेट इंग्रज आलेल्या काळातील, तर काही सेट त्या आधीच्या काळातील आहे. 
 

> किल्लेदेखील उभारले
निर्मात्यांनी याचे शूटिंग आंध्र प्रदेशमध्ये केले आहे. चित्रपटासाठी अनेक किल्ले उभारण्यात आले. 
 

> आगीमुळे जास्त नुकसान नाही
यातच एकदा सेटवर आग लागली होती. सूत्रानुसार, यामुळे सेटचे जास्त नुकसान झाले नाही. मात्र, निर्मात्याला यामुळे जवळजवळ २ कोटी रुपये जास्त खर्च करावे लागले. 
 

> बरेच लोक होते हजर
साधारणत: चित्रपटाच्या सेटवर तंत्रज्ञांची एक टीम आणि क्रू मेंबर्स मिळून अनेक लोक काम करत होते. 
 

सकाळी ७ वाजताच सेटवर जायचा चिरंजीवी
यात चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहे. तो यात एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या पात्राविषयी जाणून घ्या...
 
> चिरंजीवीला आपल्या पात्रासाठी तयार व्हायला एक तास लागायचा.
> खांद्याची शस्त्रक्रिया झालेली असूनही चिरंजीवीने चित्रपटात स्वत:च स्टंट्स केले. त्याला निर्मात्यांनी असे करायला सांगितले होते. 
> शूटिंगसाठी चिरंजीवी सकाळी ४.३० वाजता उठायचा आणि सर्वात आधी सेटवर जायचा.
 
 

हे कलाकार दिसतील
या मल्टिस्टारर चित्रपटात चिरंजीवीच्या व्यतिरिक्त जगपति बाबू, जगपति बाबू, अमिताभ बच्चन, किच्चा सुदीप, नयनतारा, तमन्ना, निहारिका आणि रवि किशनसारखे प्रसिद्ध कलाकार दिसतील.