आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुनामीचा हाहाकार; 281 ठार, 1000 हून अधिक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जकार्ता - इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या सुनामीत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. यात भीषण आपत्तीत 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. सुनामीनंतर उसळलेल्या लाटा किनारपट्टी ओलांडून  शेकडो मीटर पसरल्या. त्यांनी मार्गात येणारी प्रत्येक वास्तू उद्ध्वस्त केली. यात हजारो घरे जमीनदोस्त, तर वाहनांचा चेंदामेंदा झाला. सर्वत्र ढिगारे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. 

 

का आली सुनामी
आपत्ती निवारण संस्थेनुसार, क्राकातोआ ज्वालामुखीचे बाळ म्हटल्या जाणाऱ्या अनाक ज्वालामुखीत स्फोट झाले. त्यामुळे समुद्रात भूस्खलन होऊन सागरी लाटांत असामान्य बदल झाले. त्यांनी सुनामीचे रूप धारण केले.

 

कुठे आली सुनामी
पश्चिमेकडे जावा आणि सुमात्राच्या मध्यभागी असलेल्या सुंडा खाडीत भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 9:27 वाजता सुनामी आली.

 

कुठे उडाला हाहाकार
इंडोनेशियाच्या बांटेन प्रांतातील पांडेगलांग व सेरांग जिल्हे तसेच लाम्पुंग प्रांतातील दक्षिण लाम्पुंगच्या किनारपट्टीला सुनामीचा तडाखा बसला.

 

सर्व भारतीय सुरक्षित
> इंडोनेशियात राहणारे भारतीय सादिक काझी म्हणाले, ‘सुनामी आली तेव्हा सुंडा बेटावर सॅटर्डे नाइट पार्टी सुरू हाेती. येथे दर शनिवारी अशा पार्ट्या होतात. अचानक धडकलेल्या सुनामीने अनेकांना वाहून नेले. हाहाकार उडाला. या ठिकाणी भारतीय व आशियाई नागरिकांची संख्या कमीच असते. यामुळे इंडाेनेशियातील सर्व भारतीय सुरक्षित आहेत.’


> इंडाेनेशियाचा भाग ‘फायर ऑफ रिंंग’वर वसलेला असल्याने इथे सातत्याने भूकंप हाेत रहातात. इथल्या नागरिकांना भूकंप आणि त्यानंतर येणाऱ्या सुनामीची सवयच आहे. सुंडा खाडीत भूकंपावेळी मी माझ्या सहकाऱ्यांसह जकार्तामध्ये हाेताे. जकार्ता आणि व सुनामीच्या ठिकाणात सुमारे 100 किमीचे अंतर आहे.

बातम्या आणखी आहेत...