Home | Maharashtra | Vidarva | Akola | 63 million liters of water left from Van project within 11 hours

वान प्रकल्पातून ११ तासांमध्ये सोडले ६३ कोटी लिटर पाणी; परिसरात सतर्कतेचा इशारा

श्रीकांत जोगळेकर | Update - Aug 25, 2018, 11:55 AM IST

तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे १ ते ६ क्रमाकांचे दरवाजे २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता १० सेंटीमीटरने उघडण्यात आले.

 • 63 million liters of water left from Van project within 11 hours

  अकोला- तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे १ ते ६ क्रमाकांचे दरवाजे २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. प्रति सेकंद २२ हजार लिटर या नुसार पाणी सोडले जात असून रात्री दहा वाजे पर्यंत ६३ कोटी लिटर पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


  मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच जलप्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा आणि वान प्रकल्पातील जलसाठ्यातही दररोज वाढ होत आहे. वान प्रकल्पातून चार दिवसापूर्वीच ७५ टक्क्याच्या वर जलसाठा गेल्या गेट उघडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने गेट उघडले गेले नाही. मात्र २४ ऑगस्टला सकाळपासून प्रकल्पात येणारी पाण्याची आवक लक्षात घेवून प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटी मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. वान प्रकल्पाला सहा दरवाजे असून दरवाजा क्रमांक १ आणि दरवाजा क्रमांक ६ हे दोन उघडण्यात आले. यातून प्रति सेकंद २२ हजार लिटर पाणी सोडण्यात आले. रात्री दहा पर्यंत प्रकल्पातून ६३ कोटी लिटर पाणी सोडण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत प्रकल्पाचे दरवाजे बंद केले नव्हते. त्यामुळे विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.


  ११ दिवस होऊ शकला असता शहराला पुरवठा
  अकोला, बुलडाणा व अमरावती सिमेवर असलेल्या वारी येथील हनुमान सागर प्रकल्पात आतापर्यंत ८६ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे वान प्रकल्पातून सोडण्यात रात्री दहा वाजे पर्यंत सोडण्यात आलेल्या ६३ कोटी लिटर मधून शहराची ११ दिवसाची तहान भागली असती.


  काटेपूर्णाची वाटचाल गेट उघडण्याकडे
  काटेपूर्णा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर आहे. काटेपूर्णा प्रकल्पात तूर्तास ६९.९५ दलघमी (८१ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पात ९० टक्क्याच्या वर जलसाठा उपलब्ध झाल्या नंतर या प्रकल्पाचे गेटही उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.


  प्रकल्पातील जलसाठा असा (दलघमीमध्ये)
  काटेपूर्णा : ६९.८४
  वान प्रकल्प : ७१.५३
  मोर्णा प्रकल्प : १८.९८
  निर्गुणा : २७.९८
  उमा प्रकल्प : ११.६८ (१००%)
  दगडपारवा : २.१५


  दोन वर्षापूर्वी उघडले होते ४ दरवाजे
  वान प्रकल्प सातपुड्याच्या कुशीत वसलेला आहे. दोन्ही कडून पहाड असलेल्या या प्रकल्पामुळे अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. अद्याप या प्रकल्पाने डेड स्टोरेज पाहिले नाही. उन्हाळ्यात इतर प्रकल्प कोरडे पडले असताना वान प्रकल्पात मात्र मुबलक जलसाठा होता. वान प्रकल्पाचे २१०६ रोजी सहा पैकी चार दरवाजे उघडले होते.


  सन २०१४ ला केले नियमात बदल
  पूर्वी धरणातील जलसाठ्याबाबत वेगळे नियम होते. त्यानुसार सन २०१० पर्यंत प्रकल्पात १५ ते ३१ ऑगस्टपर्यंत ९० टक्के जलसाठा ठेवण्याचे धोरण शासनाने निश्चित केले होते. पावसाचा बेभरवशीपणा लक्षात घेवून या धोरणात २०१४ ला बदल करण्यात आला आहे. आता १ ते १५ऑगस्ट पर्यंत ९५ टक्के, १ ते १५ सप्टेंबर पर्यंत ९८ टक्के पाणी ठेवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

Trending