आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 63 year old Anil Kapoor Was Seen Young Than 34 year old Aditya In 'Malang', Said : 'He Was The One Who Created My Diet Plan'

'मलंग' मध्ये 34 वर्षांच्या आदित्यपेक्षा यंग दिसले 63 वर्षांचे अनिल कपूर, म्हणाले - 'त्यानेच बनवला होता माझा डाएट प्लॅन'

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता अनिल कपूर नुकताच ‘मलंग’मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या नकारात्मक भूमिकेचे कौतुकही झाले. याशिवाय चित्रपटातील त्याचा लूक, टॅटू आणि शरीरयष्टीही चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र, अनिलने या चित्रपटात आपले पात्र अचूकपणे साकारण्यासाठी बरेच वजनही कमी केले आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याच्याशी झालेली बातचीत...

‘मलंग’साठी कशा प्रकारे वजन कमी केले?

हा फंक्शनल आणि वेट ट्रेनिंगचा परिणाम आहे. जेवढे सांगण्यात आले तेवढाच आहार मी घेतला. माझा प्रशिक्षक मार्कने व्यायामाचे संपूर्ण वेळापत्रक बनवले होते. त्यानुसार मी नियमित व्यायाम केला. याचे नियोजन मी स्वत: केले होते. यासाठी मला सहकलाकार आदित्यने मदत केली. त्याने माझ्यासाठी डाएट प्लॅन तयार केला. तो इतका चांगला होता की, मी अजूनही त्यानुसारच आहार घेतो. Ã यादरम्यान तुझा आहार कशा प्रकारचा होता? आदित्यने माझ्यासाठी अत्यंत कडक डाएट प्लॅन बनवला होता. यात त्याने उच्च पोषक द्रव्यांवर भर दिला. आरोग्यास हानिकारक पदार्थांचा यामध्ये समावेश नव्हता. मी अजूनही याच वेळापत्रकानुसार आहार घेतो. कारण यामुळे मला खूप हलके आणि ऊर्जावान असल्यासारखे वाटते.

चित्रपटात तुझा लूक आणि टॅटूचीदेखील खूप चर्चा झाली. याबद्दल काय सांगशील?

‘मलंग’मध्ये माझे पात्र खूप वेगळे होते. ते साकारण्यासाठी मला आपला लूक आणि स्टाइलसह अनेक गोष्टींमध्ये बदल करून घ्यावा लागला. वजन कमी करणे आणि शरीरावर टॅटू गोंदवून घेणे हे माझ्या पात्राच्या आयुष्यात दररोज घडणाऱ्या गोष्टींना दर्शवते. या पात्रासाठी मी शारीरिकदृष्ट्याच नाही तर मानसिकरीत्याही खूप मेहनत घेतली आहे.