आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 63 year old Coach Is Determined To Become An International Player In The Tribal Belt

इराणला चॅम्पियन बनवणाऱ्या ६३ वर्षीय काेचचा आदिवासी पाड्यात आंतरराष्ट्रीय खेळाडूू घडवण्याचा निर्धार; ४० मुलींना माेफत प्रशिक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकच्या काेच शैलजा जैन यांच्या मार्गदर्शनात २०१८ मध्ये इराणचा संघ एशियन चॅम्पियन
  • नाशकापासून १५० किमी अंतरावरील गुहीत ट्रेनिंग

एकनाथ पाठक ]

औरंगाबाद - ऑलिम्पियन घडलेल्या आदिवासी पाड्यातून आता आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तयार करण्यासाठी ६३ वर्षीय इंटरनॅशनल काेच शैलजा जैन यांनी  एक  माेहीम हाती घेतली. यातून इराणच्या टीमला एशियन चॅम्पियनशिप मिळवून देणारी ही काेच आता नाशिक जिल्ह्यातील गुही या भागातून कबड्डीपटू निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे. यासाठी पाड्यावरच्या ४० मुलींना माेफत कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे.पाड्यांतून पसंती; ४० खेळाडूंची निवड : 


आपल्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडवण्याच्या माेहिमेला पाड्यांतूनही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे टॅलेंट सर्च हंटमधून शैलजा यांनी ४० महिला खेळाडूंची निवड केली. आता या सर्व खेळाडूंना त्या काेचिंग करत आहेत. यासाठी त्यांना परिसरातील वनवासी आश्रमशाळेची माेलाची मदत मिळत आहे. 

वर्षभरात उपक्रमाला सुरुवात; खेळाडूंचा प्रतिसाद

पाड्यावरच्या मुलींमध्ये प्रचंड गुणवत्ता असल्याचे जि.प.च्या स्पर्धेतून लक्षात आले. त्यामुळे या सर्वांचा शाेध घेतला आणि वर्षभरापासून यांच्या प्रशिक्षण माेहिमेला सुरुवात केली. याला  स्थानिक  खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. यांच्या पालकांना समजून  सांगितल्याने संख्येत वाढ झाली. स्वत:च्या खिशातून पैसे खर्चून खेळाडूंना किट दिले. यामुळे त्यांच्यात उत्साह वाढला, असेही त्या म्हणाल्या.३७ वर्षांपासून काेचिंग;  इराणचा महिला संघ चॅम्पिय


मूळ नागपूरच्या असलेल्या शैलजा यांनी ५ वर्षांपर्यंत राष्ट्रीय खेळाडूची भूमिका बजावली.  विदर्भाच्या कर्णधार आणि नागपूर विद्यापीठाच्या सदस्यीय खेळाडू  त्या हाेत्या. १९८३ मध्ये त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. या ३७ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी भारत, नेपाळ व इराणला ट्रेनिंग दिले. यात इराण संघ चॅम्पियन ठरला.