आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेटला चौथ्या तिमाहीत ६४ हजार कोटींचा नफा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - गुगलची मालकी असलेली कंपनी अल्फाबेटने २०१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये ३९.३ अब्ज डॉलर (सुमारे २.८ लाख कोटी रुपये)चा महसूल मिळवला आहे. हा २०१७ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेमध्ये २२ टक्के जास्त आहे. यातील ३२.६ बिलियन डॉलर (२.३ लाख कोटी रुपये) महसूल गुगल जाहिरातींमधून आला आहे. 

 

चौथ्या तिमाहीमध्ये हार्डवेअर, प्ले स्टोअर आणि गुगल क्लाऊडमधून कंपनीने ६.४ अब्ज डॉलर (सुमारे ४६ हजार कोटी रुपये) चा महसूल मिळवला आहे. जगभरात ९८,७७१ कर्मचारी असलेली कंपनी अल्फाबेटने चौथ्या तिमाहीमध्ये ८.९४ अब्ज डॉलर (६४ हजार कोटी रुपये) चा नफा मिळवला आहे. 


अल्फाबेटचे मुख्य वित्त अधिकारी रुथ पोराट यांनी सांगितले की, २०१८ मध्ये कंपनीने ९.८ लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. चौथ्या तिमाहीमध्ये २.८ लाख कोटी रुपयांचा महसूल आला आहे. तरी देखील कंपनीच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे.
 
अल्फाबेटच्या शेअरमध्ये घसरण 
अपेक्षेपेक्षा चांगला निकाल जाहीर झाल्यानंतरही अल्फाबेटच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. कंपनीचा खर्च वाढत असल्याने ही घसरण झाली असल्याचे मानले जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अल्फाबेटच्या शेअरमध्ये ३.३ टक्क्यांची घसरण होऊन ते ११०३.५० डॉलर (सुमारे ७९ हजार रुपये) प्रति शेअर झाले. चौथ्या तिमाहीमध्ये गुगलचा एकूण खर्च ३१ अब्ज डॉलर (सुमारे २.२ लाख कोटी रुपये) राहिला. गेल्या वर्षी या समान तिमाहीमध्ये गुगलचा खर्च १.७६ लाख कोटी रुपये होता. सिलिकॉन व्हॅलीतील तज्ज्ञ राॅब एंडेर्ले यांनी सांगितले की, गुगलकडे जाहिरात बिझनेस म्हणून सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र, कंपनी इतर ठिकाणी बेसुमार खर्च करू शकते, असा त्याचा अर्थ होत नाही. ऑनलाइन जाहिरात बाजारात गुगलची भागीदारी सुमारे ३१ टक्क्यांपर्यंत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...