देशातील ११६ जागांवर सरासरी ६५.७० टक्के मतदान, २०१४ पेक्षा ४ टक्के कमी मतदानाची नोंद

दिव्य मराठी

Apr 24,2019 08:35:00 AM IST
नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १५ राज्यांतील ११६ जागांवर मंगळवारी सायं. ५.०० पर्यंत ६२.७५% मतदान झाले. २०१४ मध्ये या ११६ जागांवर ७०.११% मतदान झाले होते. २००९ मध्ये येथे ६१.८% मतदान झाले होते. गेल्या वेळी मतदान कलाच्या विश्लेषणातून उघड होते की, मत टक्का वाढल्यावर भाजपला फायदा होतो. २०१४ मध्ये ८.३१% मतदान वाढल्यावर भाजपला या ११६ मतदारसंघांत १९ जागांचा फायदा झाला, तर काँग्रेसला २१ जागांचे नुकसान झाले होते. २००९ मध्ये काँग्रेसला ३८ व भाजपला ४४ मिळाल्या होत्या.
X