आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ मुलांच्या ६५ वर्षीय पित्याने ५५ वर्षीय विधवेशी केला निकाह; रमजानमध्ये अजमेर दर्ग्यात झाली होती दोघांची भेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडता - राजस्थानातील नागोर येथील मेडता सिटीमध्ये अनोखा विवाह सोहळा पार पडला. येथे १४ अपत्यांच्या ६६ वर्षीय पित्याने ५५ वर्षांच्या विधवेशी निकाह केला. तर ९५ वर्षांच्या मातेने सून-मुलास आशीर्वाद दिले. १४ मुले व ४९ नातवंडे-पतवंडे या निकाहाचे साक्षीदार ठरले. हे लग्न या भागात चर्चेचा विषय ठरले आहे. प्रतिनिधीस मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यत्यारस्यां भाटी १४ मुलांचे पिता आहेत. ८ वर्षापूर्वी त्यांची पत्नी भुरी बानो यांचा मृत्यू झाला होता. 

 

मुख्त्यार यांना आहेत 7 मुले आणि 7 मुली

ळालेल्या माहितीनुसार मुख्त्यारस्यां भाटी मेडता नगरच्या साइयों भागात राहतात. 8 वर्षांपूर्वी त्यांची पत्नी भूरी बानो यांचे निधन झाले. अजमेर येथील आमना खातून यांच्या पतीचे देखील काही वर्षांपूर्वी निधन झाले. मुख्त्यार यांच्या 14 अपत्यांमध्ये 7 मुले आणि 7 मुली आहेत. या विवाह सोहळ्यात मुख्त्यारस्यां यांच्या आईसह मुले-मुली, नातवंडे-पतवंडे आणि सासरच्या मंडळींसह राजकीय नेते आणि समाजसेवकांची उपस्थिती होती. मुख्त्यारस्यां गंवडीचे काम करतात. ते भाजपाच्या अल्पसंख्यक मोर्चा मेडता शहर मंडळाचे उपाध्यक्ष देखील राहिले आहेत. 

 

अजमेर दर्ग्यात झाली होती भेट
पहिल्या पत्नी निधनानंतर मुख्त्यारस्यां दुःखी राहत होते. ते दुसरा जोडीदार शोधण्याच्या तयारीला लागले. काही दिवसांपूर्वी रमजानचा महिना सुरू झाला तेव्हा त्यांनी अजमेरच्या दर्गा शरीफमध्ये राहून रोजा ठेवण्याचे ठरवेल. ते रोजा दरम्यान दर्गा शरीफमधे राहिले. दरम्यान अजमेर निवासी आमना खातून यांच्याशी त्यांची भेट झाली. येथूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.