आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 65th Filmfare Awards To Be Held In Guwahati Not In Mumbai, Information By CM Sonowal On Instagram

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई नाही गोवाहाटीमध्ये होईल 65 वे फिल्म फेअर अवॉर्ड्स; सीएम सोनोवालने इंस्टाग्रामवर दिली माहिती 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेअर अवॉर्ड्स यावेळी मुंबईमध्ये होणार नाही. अवॉर्ड नाइटचे आयोजन 15 फेब्रुवारी 2020 ला गोवाहाटीमध्ये होईल. याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवालने आपल्या इंस्टाग्राम पेजवर दिली आहे. ज्यामध्ये असम सरकार आणि ऑर्गनायझर्स यांच्यात साइन झालेल्या एमओयूबद्दलही सांगितले गेले आहे.  

अवॉर्डच्या ऑर्गनायझर टाइम्स ग्रुपव्यतिरिक्त या एमओयूवर सीएम सर्बानंद सोनोवाल, आसामचे पर्यटन मंत्री चंदन ब्रह्मा, आसाम टुरिजम डेव्हलपमेंटचे चेयरमन जयंता माला बरुआ आणि राज्य सरकारमध्ये पर्यटन विभागाचे कमिश्नर-सेक्रेटरी एम अंगामुथु यांनी मिळून साइन केले आहे. 

65 वर्षांपूर्वी सुरु झाले आहेत अवॉर्ड...  


इंग्रजी मॅगझीन फिल्म फेअरच्या वतीने हिंदी चित्रपटाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ योगदानासाठी हे अवॉर्ड दरवर्षी दिले जातात. याची सुरुवात 1954 मध्ये झाली जेव्हा राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचीदेखील स्थापना नव्हती झाली. पुरस्कार जनतेचे मत आणि ज्यूरीच्या सदस्यांच्या मतांच्या आधारावर दिले जातात. यापूर्वी या पुरस्कार समारोहाचे नाव ‘द क्लेयर्स’ होते जे चित्रपटांचे समालोचक क्लेयर मेंदिनोचा यांच्या नावावर आधारित होते. 21 मार्च 1954 ला झालेल्या पहिल्या पुरस्कार समारोहामध्ये केवळ पाच पुरस्कार ठेवले.  

बातम्या आणखी आहेत...