आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६६७ गावांना करणार डिजिटली कनेक्ट; दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरापर्यत नेणार शिक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ग्रामीण भागातील शिक्षणाची वाट खूप बिकट असते. त्यातही तो भाग आदिवासी असेल तर वाट बिकटच नाही अवघड होऊन जाते. संघर्षावर मात करीत ही मुले शिकतात. अनेकदा ही मुले शाळेपर्यत पोहोचू शकत नाही. हरकत नाही, आपण त्यांच्यापर्यंत शाळा घेऊन जाऊ, असे स्वप्न केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले. त्यांची स्वप्न पूर्ती आता होत आहे. नागपूर, मेळघाट, मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या सुमारे ६६७ गावांना डिजिटली कनेक्ट करण्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणार आहे. 


या स्वप्नांना गडकरींनी आश्वासक आधार दिला तर कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टने या स्वप्नांना पंख दिले आणि मूळचे नागपूरचे आणि आता मुंबईत स्थायिक झालेले प्रसन्ना मोहिले यांनी बळ दिले. प्रसन्ना मोहिले हे मुंबई येथे परनाॅर्ड रिकार्ड इंडिया या फ्रेंच मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हृदयावर आहेत. मुंबईत स्थायिक असूनही नागपुरशी असलेली नाळ त्यांनी घट्ट ठेवली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिन्स्पासिबीलिटी फंडातून या प्रकल्पासाठी ५ कोटींची मदत केली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण करणार अाहे, अशी माहिती मोहिले यांनी दिली. 


असा आहे प्रकल्प 
या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सुमारे ५०० प्रशिक्षक तयार करण्यात आले. त्यांना रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व प्रशिक्षकांना टॅब व १६ एमएम स्क्रीन असलेला प्रोजेक्टर देण्यात येईल. प्रकल्पाचा मेन सर्व्हर नागपुरात राहिल. मुलांना शिकवण्याच्या विषयाची माहिती टॅबमध्ये डाऊनलोड करण्यात येईल. त्या नंतर संबंधित गावात एखादे मैदान अथवा शाळेत प्रोजेक्टर लावून मुलांना सोप्या चित्रांद्वारे विषय शिकवण्यात येईल. कौशल्य विकास, आरोग्य आणि स्वच्छता, शिक्षणासह शालेय अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. 


व्यसन मुक्तीसाठी 'स्कूल टिप्स' प्रकल्प 
शालेय विद्यार्थ्यांमध्ये सिगारेट ओढणे, तंबाखू व खर्रा खाणे, प्रसंगी दारू पिणे अशी व्यसने आढळतात. त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी "स्कूल टिप्स' प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. "आयएल अॅण्ड एफएस' संस्थेच्या सामाजिक शाखेच्या मदतीने राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या परवानगीचा प्रस्ताव लवकरच शिक्षण विभागाला सादर करण्यात येणार आहे. मुलांना दृकश्राव्य माध्यमातून ध्वनीचित्रफितीद्वारे सोप्या तऱ्हेने व्यसनांचे धोके समजावून सांगण्यात येणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...