आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • 66th National Film Award 2019 : Award Distribution By Vice President M Venkaiah Naidu

आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, 'पाणी'साठी आदिनाथ कोठारेचाही गौरव

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • अवॉर्ड तीन श्रेणींमध्ये - फीचर फिल्म, नॉन फीचर फिल्म, मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट आणि चित्रपटात श्रेष्ठ लेखन यामध्ये दिले जाणार आहेत
 • बिघडलेल्या तब्येतीमुळे दादा साहेब फाळके अवॉर्डसाठी येऊ शकले नाहीत अमिताभ बच्चन

नवी दिल्ली : संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण आज विज्ञान भवनात झाले. उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कलाकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेता आयुष्मान खुराणा आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विकी कौशलला 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटासाठी तर आयुष्मान खुराणाला 'अंधाधुन' या चित्रपटातील भूमिकेसाठी गौरविण्यात आले. अभिनेता अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन' या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

आयुषमान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंधाधून’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधून’ या चित्रपटाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगलंच कौतुक झालं होतं. एक डोळस व्यक्ती अंधाच्या नजरेने जग शोधत असताना चित्रविचित्र घटना घडतात आणि चित्रपटाचा शेवट प्रेक्षकाला कोड्यात टाकतो. 

66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचाही बोलबाला राहिला. ‘भोंगा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुधाकर रेड्डी यांना देण्यात आला. 'चुंबक' या चित्रपटासाठी स्वानंद किरकिरे सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कारचे मानकरी ठरले. 'पाणी' या चित्रपटासाठी पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता आदिनाथ कोठारेने स्वीकारला. 'पाणी' या चित्रपटाचा आदिनाथ दिग्दर्शक आहे. 

या सोहळ्याला माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, दादा साहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर उपस्थित होते. अभिनेत्री दिव्या दत्ता आणि सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी 

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून
 • सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी
 • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
 • सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
 • पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
 • सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
 • सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा
 • पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
 • सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी (नाळ)
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा- तेलुगू चित्रपट ‘महानटी’
 • सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- हेलारो
 • सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट ‘तारीख’
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्ती सुरेश (महानटी)
 • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- तेलुगू चित्रपट ‘ऑ’ आणि कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
 • सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- कन्नड चित्रपट ‘केजीएफ’
 • सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हरजीता
बातम्या आणखी आहेत...