आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघर महिलेला अशाप्रकारे मदत करुन पोलिसांनी ठेवला नवा आदर्श; सगळीकडून कौतुकाचा वर्षाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सध्या चेन्नईतील पजावंतागल पोलिस स्टेशनमधील पोलिसांचे सगळीकडे कौतुक होत आहे. या ठाण्यातील पोलिसांनी एका वृद्ध महिलेला मदत करुन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. जवळपास 8 महिन्यांआधी पजावंतागल ठाण्यात एक अनुसया (वय- 66) नावाची वृद्ध महिला आली होती. अनुसया यांना आपल्या मुलाने दारुच्या नशेत घरातून बाहेर काढल्याने त्याची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळण्याच्या अपेक्षेने त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्या होत्या. तिथे अनुसया यांनी पोलिसांना आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत करुन पोलिस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी म्हणुन काम दिले.

 

मागील 8 महिन्यांपासून अनुसया दररोज सकाळी 7 वाजता पोलिस स्टेशनमध्ये येऊन सर्व साफसफाई करतात. तिथिल पटांगणात रांगोळी काढतात. कर्मचाऱ्यांच्या टेबलावरील बाटल्या भरुन ठेवतात. स्टेशनच्या आवारातील झाडांना पाणीदेखील देतात. त्याबदल्यात पोलिस कर्मचारी अनुसया यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात. 27 नोव्हेंबरला अनुसया यांनी सकाळी पोलिसस्टेशनमध्ये साफसफाई केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना चॉकलेट वाटले. पोलिसांनी त्यांना यामागचे कारण विचारले असता त्यांनी आपला जन्मदिवस असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने केक आणून सर्वांच्या उपस्थितीत अनुसया यांचा वाढदिवस साजरा केला. पोलिसस्टेशनमध्ये वाढदिवस साजरा केल्याने अनुसया भावुक झाल्या.

 

अनुसया यांनी सांगितले, 'माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा कोणीतरी अशाप्रकारे माझ्यासाठी केक आणला. माझा वाढदिवस साजरा केला. पोलिस हे जनतेचे मदतगार असतात हे मी ऐकले होते पण आज मला त्याची प्रचिती आली.'

बातम्या आणखी आहेत...