आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 67 Young Women, Including 7 Minors Held In A Hotel, Raided Property Worth Rs 150 Crore In Indore

हाॅटेलमध्ये बंधक 7 अल्पवयीनांसह 67 युवती, इंदूरमध्ये छाप्याच्या कारवाईत 150 कोटी रुपयांची संपत्ती उघड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर : मध्य प्रदेशमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात इंदूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका वृत्तपत्राचे मालक जितू ऊर्फ जितेंद्र सोनी, त्याचा मुलगा अमित सोनी यांचे हाॅटेल माय होम, घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले. यादरम्यान हाॅटेलमध्ये ६७ युवती आढळल्या. त्यांना बंधक बनवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचा संशय आहे. त्याशिवाय पोलिसांना हनी ट्रॅपशी संबंधित कागदपत्रे, पेन ड्राइव्ह, सीडी, ३० पेक्षा जास्त प्लाॅट-जमिनींची रजिस्ट्री मिळाली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

रविवारी संध्याकाळपर्यंत चाललेल्या कारवाईनंतर पोलिसांनी जितू आणि अमित यांच्यावर मानव तस्करी, आयटी अॅक्ट, शस्त्रास्त्र कायदा, प्रतिबंधात्मक आणि शासकीय कामांत अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अमितला पोलिसांनी अटक केली असून जितू फरार आहे. एसएसपी रुचिवर्धन मिश्र यांनी सांगितले की, पोलिस-प्रशासनासह महिला आणि बाल विकास विभागाच्या चमूने शनिवारी रात्री १०.२० वाजता हाॅटेलवर छापा टाकला असता तेथे लहान-लहान खोल्यांत सुरू असलेल्या डान्स बारमध्ये युवतींसह ७ मुलेही होती. त्यांची सुटका करून त्यांना जीवन ज्योती आश्रमात पाठवले आहे. यादरम्यान हाॅटेल मालक, कर्मचारी आणि काही लोकांनी पोलिसांशी वाद घातला. तेव्हा पोलिसांनी वाॅरंट दाखवून तपासणी केली. नंतर सोनीच्या कनाडियास्थित बंगल्यावरही छापा टाकण्यात आला. तेथे ज्या रजिस्ट्री मिळाल्या, त्या दुसऱ्यांच्या नावावर आहेत. अमितची परवाना असलेली बंदूक काडतुसांसह जप्त करण्यात आली. एसएसपींनी सांगितले की, हाॅटेलमध्ये आढळलेल्या युवतींपैकी ७ जणी विवाहित आहेत. त्या आजारी पडल्या की त्यांच्यासोबत हाॅटेलचे बाउन्सर सोबत जात असत. शरीर प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले लोक जे पैसे देत असत त्यापैकी अर्धी रक्कम सोनी ठेवत असे, बाकी त्यांना खर्चासाठी मिळत होते.

वृत्तपत्रात काही दिवसांपासून हनी ट्रॅपच्या बातम्या आणि फोटो प्रकाशित झाल्यानंतर भोपाळचे काही अधिकाऱ्यांना आपले आॅडिओ-व्हिडिओ उघड होतील, अशी शंका वाटत होती. त्यावर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि फ्री हँड घेतल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली.
 

बातम्या आणखी आहेत...