आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 7 मुलांचा बुडून मृत्यू, बिहारच्या छपरामधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा(बिहार)- येथील छपरा जिल्ह्यात  आज(रविवार) दुपारी तळ्यात पोहण्यासाठी गेल्लाय 7 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 3 मुलांना तत्काळ रुग्णालयात भर्ती केले होते, त्यांची प्रकृती नाजूक आहे. मृत मुले आपल्या मित्राला वाचवण्यासाठी तळ्यात गेले असता ही घडना घडली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, छपराच्या डोइला गावातील 10 मुले दुपारी 12 वाजता तळ्यात पोहण्यासाठी गेलेहोते. यावेळी त्यांच्यापैकी एक जण बुडत असल्याचे इतरांनी पाहीले आणि त्याला वाचवण्यासाठी हे सर्वजण गेले. पण यावेळी पाण्यात बुडून 10 पैकी 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जणांना स्थानीकांनी रुग्णालयात भर्ती केले. 

 

छपरामध्ये मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या आणि तळ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिलाय. दरम्यान 7 मुलांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.