आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7 Children Including Driver Killed In Bus School Van Collision In Madhya Pradesh

स्कूल व्हॅन-बसची समोरा-समोर धडक; भीषण अपघातात 7 चिमुकल्यांसह चालकाचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतना - मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात एक स्कूल व्हॅन आणि बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत सात चिमुकल्यांसह व्हॅन चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोबतच, इतर 10 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सतनाच्या बीसिंगपूर परिसरातील लकी कॉन्वेंट स्कूलची ही व्हॅन होती. या अपघातावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. 

 

सतना सड़क हादसे की खबर से स्तब्ध हूं, मन दुखी है। हादसे में हताहत बच्चों को श्रद्धांजलि अर्पित करता हूं। पीड़ित परिवारों के प्रति मेरी संवेदनाएं हैं। प्रशासन को आवश्यक दिशा निर्देश जारी कर दिए हैं। ईश्वर से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को शांति प्रदान करें।

— ShivrajSingh Chouhan (@ChouhanShivraj) November 22, 2018

लकी कॉन्वेंट स्कूलची व्हॅन गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास मुलांना घेऊन शाळेच्या दिशेने जात होती. त्याचवेळी अचानक आलेल्या एक बस व्हॅनला धडकली. अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा चालक आणि 6 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस आणि नागरिकांनीच 10 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. सोबतच पीडित मुलांच्या आई-वडिलांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करून या घटनेवर शोक व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...