Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा राहील तुमच्यासाठी शुक्रवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:02 AM IST

शुक्रवारी या 8 राशींसाठी आहेत शुभयोग, या 5 राशींनी राहावे सावध

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  शुक्रवार, 7 डिसेंबर रोजी कार्तिक कृष्ण अमावस्या असून ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे धृति नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 7 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, प्रत्येक राशीनुसार कसा राहील तुमच्यासाठी शुक्रवार...

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  मेष
  दिवस तितकासा अनुकूल नसल्याने आज आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. स्वप्नरंजन सोडून वास्तवतेचा विचार गरजेचा आहे.
  शुभ रंग : पिस्ता, अंक-४. 

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  वृषभ
  तुमच्या कामातील उत्साहाने विरोधक नमते घेतील. संभाषण चातुर्याने तुमची इतरांवर चांगली छाप पडेल. भाग्योदयाच्या नव्या संधी चालून येतील.
  शुभ रंग: स्ट्रॉबेरी, अंक- ५.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  मिथुन
  आज तुम्ही नेहमीपेक्षा जस्त क्रियाशील असाल. आर्थिक अडचणींतून मार्ग निघेल. सरकारी कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.
  शुभ रंग : अबोली, अंक-१. 

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  कर्क
  द्वीधा मन:स्थिती मुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. आधी स्वार्थ नंतर परमार्थ हे धोरण हिताचे. व्यवसायात भिडस्तपणाने नुकसान होईल.
  शुभ रंग : आकाशी, अंक-८.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  सिंह
  खर्चाचे प्रमाण वाढले तरी आर्थिक ओढाताण होणार नाही. नवोदीत कलाकारांना कामासाठी वणवण करणे भाग आहे. ज्येष्ठांस विश्रांतीच गरजेची.
  शुभ रंग : क्रिम, अंक-९. 

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  कन्या 
  एखाद्या महत्वाच्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. कर्जप्रकरणे लांबणीवर पडणार अहेत. घरदुरुस्तीसाठी खर्च उद्भवणार आहे.
  शुभ रंग: पिस्ता, अंक-५.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  तूळ
  घरातील ज्येष्ठांना अभिमान वाटण्याजोगे एखादे कतृत्व तुमच्या हातून घडेल. योग्य विचारांना आज योग्य कृतीची जोड दिलीत तर यश फारसे अवघड नाही.
  शुभ रंग : तांबडा, अंक- ३.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  वृश्चिक
  ज्येष्ठ मंडळी आज धार्मिक सहली किंवा तिर्थयात्रांचे बेेत आखतील. नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. विद्यार्थी आज मनापासून मेहनत घेतील.
  शुभ रंग : पिवळा, अंक- १.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  धनू
  चैनी व विलासी वृत्ती बळावेल. पैसा  कतीही आला तरी कमीच पडेल. लांबच्या प्रवासात मौल्यवान ऐवज सांभाळा. आज देण्या घेण्याचे व्यवहार चोख ठेवा.
  शुभ रंग : केशरी, अंक-२.

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  मकर
  तुमच्या कामातील उत्साहाने विरोधक नमते घेतील. वैवाहीक जिवनांत सौख्य व समाधान राहील. आज विद्यार्थी आवडत्या विषयात कौतुकास्पद कामगिरी करतील.
  शुभ रंग : नारिंगी, अंक-७.  

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  कुंभ
  तुमच्या कामातील उत्साहाने विरोधक नमते घेतील. स्वप्नरंजनापेक्षा फक्त मेहनतीस प्राधान्य दिल्यास इच्छीत नक्कीच साध्य होईल. हक्कांसाठी लढाल.
  शुभ रंग: निळा, अंक-६. 

 • आजचे राशिभविष्य 7 Dec 2018 Dainik Rashi Bhavishya 2018 in Marathi

  मीन
  व्यापारात काही लाभदायक सौदे होतील. सार्वजनिक जिवनांत मान सन्मान मिळेल. आज मनाला आनंदीत व उत्साहीत ठेवणारा दिवस असेल.
  शुभ रंग: जांभळा, अंक-५.

Trending