आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना दुर्घटनेतील मृतांची संख्या 7 वर, 6 जणांना अटक

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जालना - येथील एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी वितळलेले तप्त लोखंड अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी उपचारांदरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे. दोघांवर जालना, तर अन्य दोघांवर औरंगाबादेत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात कंपनीच्या दोन संचालकांसह अन्य चौघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना वैयक्तिक ७ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.  गुरुवारी घडलेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. प्रारंभी तिघांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. दरम्यान, याप्रकरणी जखमी कामगार अनिलकुमार नंदुराम (३०, खटंगा, जि. बलिया, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून ओम साईराम कंपनीच्या संचालकांसह अन्य ६ जणांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल झाला होता. या दुर्घटनेत जागीच ठार झालेल्या अजयकुमार रायसकल सहानी (४५), भरत रामदेव (३०), रामजितसिंग बिजवानसिंग (२१, ओम साईराम कंपनी, जालना) या तिघांची गुरुवारी सायंकाळी उशिरा ओळख पटली. शुक्रवारी दुपारी १२ वाजता नातेवाईक  आल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आले. चार मृतदेहांचे शवविच्छेदन औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित. पान ५

गुरुवारी दुर्घटना घडल्यानंतरही कंपनीत रात्रपाळीत चालले काम 
गुरुवारी दुपारी ४ वाजता दुर्घटना घडल्यानंतर फक्त दोन-सव्वादोन तास उत्पादन थांबवले होते. रात्रपाळी सुरू होताच पुन्हा त्याच गतीने बिलेट बनवण्याचे काम सुरू झाले. शिवाय, रात्रपाळीत आलेल्या कामगारांना या दुर्घटनेची माहिती मिळू नये, याचीही खबरदारी कंपनी व्यवस्थापनाने घेतली होती. मात्र, शुक्रवारी पोलिस, एमआयडीसीचे अधिकारी, सुरक्षा अधिकारी येऊन पंचनामा करतील यामुळे दिवसभर उत्पादन बंद ठेवण्यात आले.