Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | 7 people died in terrible road accident

गडहिंग्लजमध्ये भीषण अपघातात एकाच गावातील 7 जणांचा मृत्यू, दिवसभरात याच रस्त्यावर झालेल्या दोन अपघातात 9 जण ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 07:10 PM IST

एका दिवसांत 2 अपघात, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 7 people died in terrible road accident

    कोल्हापूर- गडहिंग्लजमधल्या महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच गावातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. एसटीबस आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते.


    गडहिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल 9 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी याच रस्त्यावर एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे सध्या येथील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    चंदगडहून नूलला जाताना सुमोला एसटीशी जोरदार टक्कर झाली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शेजारील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या रस्त्यामध्येच असलेली अपघाती वाहने बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Trending