दिल्ली / 7 राफेल एप्रिल-मेपर्यंत भारताच्या शस्त्रागारात

परंपंरा जोपासण्याचा अधिकार : राजनाथ 

वृत्तसंस्था

Oct 12,2019 10:58:00 AM IST

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात राफेल विमान दाखल झाल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी रात्री भारतात परतले. पुढील वर्षी एप्रिल-मेपर्यंत ७ राफेल लढाऊ विमाने भारतात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे विमान १८०० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उडण्यासाठी सक्षम आहे.

राफेलची विधिवत पूजा केल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेवर राजनाथ म्हणाले, लोकांना जे वाटते ते करावे, मला जे योग्य वाटले मी तेच केले. हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे आणि लहानपणापासूनच माझा देवावर विश्वास असल्याचे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक धर्माच्या व्यक्तींना त्यांच्या श्रद्धेनुसार प्रार्थना करायचा, परंपरा जोपसण्याचा मला अधिकार आहे. जर कोणी दुसऱ्याने असे केले असते, तर त्यावर मला अडचण झाली नसती. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, काँग्रेसमध्येच याविषयावर दुमत असेल, प्रत्येकाचे मत सारखेच असायला हवे, असे गरजेचे नाही असे सांगून त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. भारतीय वायुसेनेकडे युद्धस्थितीमध्ये प्रचंड मारा करणारी विमाने आहेत, परंतु कोणाला घाबरवण्याचा भारताचा हेतू नाही, असे ते म्हणाले. दरम्यान फ्रान्स दौरा यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

X
COMMENT