आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात तालिबानच्या 7 दहशतवाद्यांना अटक, अफगाण नॅशनल पोलिसांची मोठी कारवाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात 7 तालिबानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अफगाण नॅशनल पोलिसांनी विविध ठिकाणी छापासत्र राबवून ही कारवाई केली. पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा कंदहार शहरात झालेली गोळीबाराची व बॉम्बहल्ल्याच्या घटनांसह अनेक गुन्ह्यांत समावेश असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

 

दहशतवाद्यांकडून तीन एके-47 रायफल्स, रिमोटचलित भूसुरुंग, दारूगोळा आदी साहित्य जप्त करण्यात आले. त्यांना संबंधित विभागाकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती प्रांतीय पोलिस प्रवक्ते जमाल बराकझाई यांनी बुधवारी दिली. दरम्यान, कधीकाळी तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या कंदहारमध्ये सुरक्षा दलांकडून गत काही महिन्यांपासून व्यापक शोधमोहीम व नाकेबंदी अभियान राबवण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.