आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 8 Unknown Facts About The Day Before India Independence Day, Behind The Curtains

15 ऑगस्‍ट नव्‍हे, भारतीयांना 26 जानेवारीला हवे होते स्‍वातंत्र्य; 8 Unknown Facts

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - 1947 साली 15 ऑगस्‍टरोजी भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. मात्र भारतीयांना ही तारीख पसंत नव्‍हती. तरीही याच तारखेची निवड इंग्रजांनी का केली? जर भारतीयांच्‍या आवडीचा विचार केला गेला असता तर 1947 किंवा 1948 साली कोणत्‍या तारखेला भारतीयांना स्‍वातंत्र्य मिळाले असते? 14 ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्री संसदेचे विशेष सत्र का बोलावण्‍यात आले? स्‍वातंत्र्यानंतर देशात सर्वप्रथम तिरंगा लालकिल्‍ल्‍यावर नव्‍हे तर कोणत्‍या ठिकाणी फडकावला गेला? फाळणीनंतर पाकिस्‍तांनी नागरिकांना त्‍यांच्‍या झेंड्यापेक्षाही कोणत्‍या गोष्‍टीचा अधिक गर्व होता? 

भारताच्‍या स्‍वातंत्र्याशी संबंधित फारसे प्रकाशझोतात न आलेले हे 8 किस्‍से प्रथमच वाचा divyamarathi.com वर...

 

1) तारीख 15 ऑगस्‍ट आणि भारतीयांच्‍या भावना 
- जानेवारी 1930 साली लाहोर येथील काँग्रेसच्‍या अधिवेशनात स्‍वातंत्र्य दिवस घोषित करण्यासंबंधी प्रस्‍ताव संमत करण्‍यात आला होता. नेहरु यांनी आत्‍म‍चरित्रात लिहिले आहे की, 26 जानेवारी, 1930 रोजी स्‍वातंत्र्य दिवस साजरा करण्‍याची शपथ घेण्‍यात आली होती. या घटनेनंतर 1930 नंतर काँग्रेसशी संबंधित लोक 26 जानेवारीलाच स्‍वातंत्र्यदिन साजरा करत असे.
- मात्र इंग्रजांनी जेव्‍हा भारत सोडण्‍याचा निर्णय घेतला तेव्हा देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी त्‍यांनी 15 ऑगस्‍ट, 1947 ही तारीख निवडली. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही तारीख निवडली होती. या तारखेलाच दुस-या महायुध्‍दात दोस्‍त राष्‍ट्रांसमोर जपानी सैन्यानी शरणागती पत्‍कारली होती. भारतीयांना स्‍वातंत्र्यदिनासाठी 26 जानेवारी तारीख हवी होती. मात्र माऊंटबॅटन 15 ऑगस्‍टपेक्षा अधिक उशिर करु इच्छित नव्‍हते.
- त्‍यामुळे आपल्‍या देशाला स्‍वातंत्र्य इंग्रजांना गर्व वाटणा-या दिवशी मिळाली. राष्ट्रीयभावनेची कदर ठेवून आपण मागितलेल्‍या दिवशी ती देण्‍यात आली नाही.

 

ज्‍योतिष म्‍हणाले होते, 15 ऑगस्‍ट अशुभ दिन 
- ज्‍योतिषांनी घोषणा केली होती की, 15 ऑगस्‍ट हा अशूभ दिन आहे. त्‍यामुळे 14 ऑगस्‍टच्‍या मध्‍यरात्रीपासूनच स्‍वातंत्र्यदिन साजरा करावा. त्‍यादिवशी संविधान सभेचे विशेष सत्र बोलावण्‍यात आले होते.
- सभेचे कामकाज रात्री 11 वाजता वंदे मातरमने सुरु झाले. देशाच्‍या स्‍वांतत्र्यासाठी शहीद झालेल्‍यांसाठी 2 मिनिटे मौन बाळगण्‍यात आले. महिलांच्‍या एका गटाने सभेत तिरंगा सादर केला.

सोर्स: रामचंद्र गुहा यांचे पुस्‍तक इंडिया आफ्टर गांधी


पुढील स्लाइड्सवर वाचा, भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित आणखी काही तथ्य...

 

बातम्या आणखी आहेत...