आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - ब्रिटनमध्ये सात वर्षांच्या मुलाने त्याच्या हुशारी आणि समजूतदारपणाने डायबिटीज असलेल्या वडिलांचा जीव वाचवला. घराच्या फ्लोरवर वडिलांना बेशुद्धावस्थेत पडलेले पाहून अत्यंत हुशारीने त्याने इमर्जन्सी हेल्पलाइन क्रमांक 999 वर कॉल केला. हेडन व्हाइट नावाच्या मुलाने वडिलांना अटॅक आल्यानंतर जमिनीवर कोसळताना पाहिले होते. त्यावेळी त्याची आई बॅकीही घरी नव्हती.
मुलाने असा वाचवला वडिलांचा जीव
- हेडनच्या वडिलांना टाइप 1 डायबिटीज आहे. ते अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. ते पाहून मुलाने लगेचच 999 क्रमांकावर कॉल केला. टाइप वन डायबिटीज सर्वात हाय रिस्क स्टेज असते. त्यात थोडासाही निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.
- हेल्पलाइन एजंटने मुलाला विचारले की, तुझ्या वडिलांचे निधन झाले आहे का? त्यावर मुलगा म्हणाला नाही, त्यांच्या शरिरातून आवाज येत आहे. त्यावर एजंट म्हणाले की, त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू आहे का? मुलगा म्हणाला त्यांचा श्वास सुरू आहे, पण ते माझ्याशी बोलू शकत नाही. त्यानंतर मुलाने लगेचच मदत पाठवण्यास सांगितले. तोपर्यंत मुलाची आई बॅकीही घरी आली होती. पण मुलगा इमर्जन्सी सर्व्हीसशी फोनवर बोलत होता. त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत होता.
आईला विश्वासच झाला नाही, की मुलगा एवढा मोठा झाला
- आईने सांगितले की, तिला कळलेच नाही की, तिचा मुलगा एवढा समजूतदार बनला आहे. हेडनने वडिलांची काळजी तर घेतलीच पण त्याचबरोबर छोट्या भावालाही शांत केले. कारण तो सँडविच आणि जॅमसाठी रडत होता.
- वडिलांनी सांगितले की, पॅरामेडिक्सने माझ्या शरिरात इन्सुलिन पंप केला त्यानंतर मला बरे वाटले. मुलामुळे मला नवे जीवन मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.