Home | Maharashtra | Vidarva | Akola | 7 year old boy died in harsh beating

अमानुष मारहाणीमध्ये सात वर्षीय मुलगा झाला ठार

प्रतिनिधी | Update - Dec 09, 2018, 09:51 AM IST

दोन जणांंना अटक, दहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, अकोट येथील ग्रामीण पोलिसांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

 • 7 year old boy died in harsh beating


  अकोट- अकोट-हिवरखेड मार्गावरील फिजा हॉटेलमध्ये अनेक महिन्यांपासून कार्यरत कृष्णा गणेश जांभेकर(वय ७) याला अमानुष मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  अकोट ग्रामीण पोलिसांनी आयोजित पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती देण्यात आली. मध्य प्रदेशातील नेपानगर येथील गणेश जांभेकर हा आपला मुलगा कृष्णा सोबत फिजा हॉटेल येथे काम करायचा. गत काही महिन्यांपासून गणेश जांभेकर आपल्या गावी कृष्णाला सोडून निघून गेला. त्यानंतर कृष्णावर अत्याचाराची कुऱ्हाड कोसळली.

  फिजा हॉटेलचे मालक अकबर खान यांची दोन मुले सलीम खान अकबर खान(वय ३५), फिरोज खान अकबर खान (वय४०) हे कृष्णाला छोट्या मोठ्या कारणावरून अनन्वित छळ करायचे. त्यामुळे कृष्णाच्या शरीरावर अनेक ठिकाणी इजा झाल्या होत्या.

  असाच प्रकार ४ डिसेंबर रोजी घडला. सलीम व फिरोज याने कृष्णाला बेदम मारहाण केली. या मध्ये त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या कृष्णाला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच कृष्णाने जगाचा निरोप घेतला.

  या प्रकरणी अकोला येथील सिटी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

Trending