आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेततळ्यात पडून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, माढा तालुक्यातील घटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तळ्याजवळ खेळत असताना तोल जाऊन चिमुकला तळ्यात पडला

माढा- शेततळ्यात पडून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना माढा तालुक्यातील अंजनगाव(खेलोबा) गावातील देशमुख वस्तीवर मंगळवारी साडे पाचच्या सुमारास घडली. 
बाळू खेमराज माळी असे शेततळ्यात पडुन मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत त्यांच्या नातेवाईकाकडुन मिळालेल्या माहितीनुसार खेमराज हे देशमुख वस्तीवर राहतात. ते शेतकरी असून शेती बरोबरच ते  मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. 
खेमराज हे मंगळवारी नेहमी प्रमाणे कामाला गेले होते, तर खेमराज याची पत्नी जयश्री या घरीच काम करत होत्या. पाणी साठवण्यासाठी खेमराज यांनी घराच्या शेजारीच लहान शेततळे बांधले होते. 


खेमराज यांचा मुलगा बाळु व मुलगी घराच्या शेजारीच खेळत होते. खेळत खेळत बाळू शेततळ्या जवळ असताना त्यांचा तोल जाऊन तळ्यात पडला. ही बाब बाळूच्या बहिणीने घरात काम करित असलेल्या आई जयश्रीला सांगितली. त्यानंतर त्यांनी तात्काळ बाळूला तळ्यातुन बाहेर काढले. त्याला अनगर येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाळूच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...