आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोसा खाऊ घालण्याच्या बहाण्याने 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, घरी परतल्यावर आईला सांगितला घडलेला प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत(गुजरात)- पलसाणामध्ये 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कडोदरा पोलिसांनी आरोपीला मध्या रात्री बरेली बस स्टँडवरून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, त्यात त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. समोसा खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलीवर केला बलात्कार


10 रूपयांची नोट दाखवून जवळ बोलवले
आरोपी विकास कुमार उर्फ विकी कडोदरामध्ये दोन वर्षांपासून राहतो. आरोपी रोज मुलीच्या घरासमोरून कामावर जात होता. तो मुलीला रोज पाहत होता आणि तिला ओळखत होता. 18 मार्चला आरोपीला पगार मिळाली होती. तो रोजप्रमाणे घरी येत होता तेव्हा त्याने मुलीला पाहिले आणि तिला 50 रूपयांची नोट दाखवून समोरच्या दुकानातून तंबाखू आणण्यासाठी पाठवले. त्यानंतर तिला 10 रूपयांचे अमीष दाखवून बाहेर घेऊन गेला.


मुलीवर केला अमानवी आत्याचार
आरोपीच्या आत्याचारानंतर मुलीला खूप ताप आली आहे, ती कोणाशीच काही बोलत नाहीये आणि खातही नाहीये. तिला बिस्कीट खूप आवडते पण त्याकडेही ती आता पाहात नाहीये. मुलीच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि चार वर्षांपासून मुलीची आई नोकरी करत. घटनेच्या दिवशीही आई कामावर गेली होती, तेव्हा आरोपीने हे घृणास्पद कृत्य केले.

बातम्या आणखी आहेत...