आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षाच्या मुलीसोबत केले क्रुर कृत्य, ओळख लपविण्यासाठी अॅसिडने जाळला चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यात आरोपीने क्रुरतेची मर्यादा ओलांडली आहे. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर अज्ञाताने बलात्कार करून तिची ओळख पटू नये म्हणून अॅसिडने चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. 

 

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबर रोजी 7 वर्षाची मुलगी घरातून हरवली होती. तिच्या परिवाराने ग्रामस्थांच्या सहकार्याने तिचा शोध घेतला पण तिचा काही उपयोग झाला नाही. अखेर वडिलांनी पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनाही मुलीचा शोध घेण्यात अपयश आले.  अचानक गावकऱ्यांनी नाल्यातील झाडीत एका लहान मुलीचा मृतदेह  पडलेला असल्याचे सरपंचांना सांगितले.

 

नराधमांनी अॅसिडने चेहरा जाळण्याचा केला प्रयत्न 

सरपंच आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले असता मुलीची अवस्था पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. मुलीचा चेहरा जखमांनी भरलेला होता. मुलीचा बलात्कार करून ओळख लपविण्यासाठी नराधमांनी अॅसिडने तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला होता.  ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस आणि मुलीच्या कुटूंबीयांनी संबंधीत सुचना दिली. 

 

आरोपीने  क्रुरतेची सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही त्याचा शोध घेत असून लवकरात लवकर त्याला अटक करणार असल्याचे पोलिस अधिक्षक राकेश प्रताप सिंग यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...