Home | International | Other Country | 70 dead in Syrian attack; Death in In 4 km

सिरियात अमेरिकेच्या हल्ल्यात 70 ठार; आयएसचा 4 किमीतच खात्मा 

वृत्तसंस्था | Update - Feb 13, 2019, 09:45 AM IST

दहशतवाद्यांनी सशस्त्र शरण यावे म्हणून कारवाईला दिली गती 

 • 70 dead in Syrian attack; Death in In 4 km

  इसिसविरोधात झाली शेवटची कारवाई
  - सिरियाच्या पूर्वेकडील डीर-अल-जोर भागात निर्वासितांच्या शिबिरांना लक्ष्य बनवून सातत्याने हल्ले करण्यात आले.
  - अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले की, आमच्या सैन्याने इराक व सिरियाचे १००% भाग दहशतवादमुक्त केले आहेत.
  - सिरियात कुर्द बंडखोरांशी २०११ मध्ये सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत ३.६० लाखांहून जास्त लोक मारले गेले आहेत.

  दमास्कस- सिरियात अमेरिकेने इसिसच्या खात्म्यासाठी शेवटच्या टप्प्यातील हल्ला केला आहे. मंगळवारी अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सैन्याने विमानांतून केलेल्या हल्ल्यात ७० जण मारले गेले. तत्पूर्वी या भागातील डीर-अल-जोरमध्ये निर्वासितांच्या शिबिरांना लक्ष्य बनवण्यात आले. या हल्ल्यानंतर पूर्व सिरियात इसिसच्या दहशतवाद्यांचा पूर्वेकडील अराफात नदीच्या चार किमी भागातच खात्मा केला. याच भागात आघाडी सैन्याने हवाई हल्ले वाढवले आहेत. अमेरिका समर्थित कुर्दांच्या सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने (एसडीएफ) इराक सीमेजवळ आयएसच्या ताब्यातील मशिदीवरही हल्ला केला. एसडीएफच्या मीडिया कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी तिला कंट्रोल रूम बनवले होते. सोमवारच्या हल्ल्यात ७ मुले, १६ नागरिक, १९ दहशतवादी व एसडीएफचे १२ जवान मारले गेले होते. इसिसविरुद्ध हल्ल्यांच्या शेवटच्या टप्प्यात अराफात नदी भागात अभियान सुरू केले.आयएसनेही प्रतिहल्ले केले व जवानांना बंदी बनवले.

  दहशतवाद्यांनी सशस्त्र शरण यावे म्हणून कारवाईला दिली गती
  सिरिया युद्धाची निगराणी करणाऱ्या ब्रिटनची मानवाधिकार संघटना सिरियन ऑब्झर्व्हेटरीचे प्रमुख रामी अब्देल यांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांनी सशस्त्र शरण यावे म्हणून पूर्व सिरियात कारवाईला गती देण्यात आली आहे. डीर-अल-जोर भागात गतवर्षी सप्टेंबरमध्ये आघाडी सैन्याने इसिसविरोधात अभियान सुरू केले होते. डिसेंबरपासून ते आतापर्यंत हजारो लोकांना तेथून काढले गेले.

  इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन सैनिक ठार
  सिरियाच्या दक्षिण भागात सोमवारी इस्रायलच्या सैन्याने रणगाड्यांतून हल्ला केला. त्यात इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डचे दोन सैनिक ठार झाले. अरब मीडियाने याचे वृत्त दिले आहे. मात्र, क्युनेत्रा प्रांतात इस्रायली सैन्याने रणगाड्यांतून रुग्णालये व निगराणी केंद्रावर हल्ले केल्याचा दावा सिरियाच्या सरकारी मीडियाने केला आहे.


  २० हजार नागरिकांना वाचवले...
  सिरियात अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सैन्याने आयएसच्या बालेकिल्ल्यातून २० हजार लोकांना बाहेर काढले व त्यानंतर विमानांतून बॉम्बहल्ले केले.

Trending