आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळशीतील वनविभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकांचा स्पोट, डुक्कर मारण्यासाठी आणले होते स्फोटके...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील मुळशीमधील वन विभागाच्या कार्यालयात 70 ते 80 स्फोटकांचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटामुळे  परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नसून, कार्यालयाच्या इमारतीसह साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, मुळशीतील पौड येथे पुणे-कोलाड महामार्गाजवळ असलेल्या ताम्हिणी अभयारण्याच्या वनक्षेत्रपाल कार्यालयात हा स्फोट झाला. डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 70 ते 80 स्फोटके पहाटे 4 वाजता उडाली. या स्पोठात वन खात्याच्या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. पोलिस विभागाने घटनेचा तपास सुरू केला असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, गर्मीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...