आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुराख्याने 70 वर्षांच्या शेतकऱ्याच्या डोक्यात घातले कुऱ्हाड, शेतात गुरे हाकण्यावरून झाला वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - शेतात गुरे शिरत असल्याच्या वादातून एका गुराख्याने 70 वर्षांच्या शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडाने वार केले. यावलच्या शिरागड येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी पंडित राजाराम साळुंखे (वडोदा) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


- पंडित राजाराम सोळुंखे शिरागड येथील आपल्या शेतात रविवारी सकाळी काम करत होते. त्याच दरम्यान पुंडलिक नावाचा एक गुराखी आपली गुरं घेऊन शेतात शिरला. आपल्या पिकांचे नुकसान होणार या भीतीने सोळुंखे यांनी वेळीच पुंडलिकला अडवले. याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पुंडलिक सोळुंखे यांच्या अंगावर धावून आला आणि त्याने आपल्या हातातील कुऱ्हाडाने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. वार इतका जबरदस्त होता की सोळुंखे रक्तबंबाळ अवस्थेत जागीच कोसळले.

- रागाच्या भरात आपण काय केलो हे पुंडलिकच्या लक्षात आले आणि त्याने वेळीच घटनास्थळावरून पळ काढला. तोपर्यंत सोळुंखे यांची मुले शेतात आली. त्यांनीच आपल्या वडिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना केले.

 

बातम्या आणखी आहेत...