आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका: नाताळच्या दिवशी वृद्ध आजोबांना मिळाली सर्वात मोठी भेटवस्तू; 350 रुपयांची पैज लावून जिकंले कोट्यावधी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू जर्सी- अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध आजोबांना नाताळच्या दिवशी सर्वात मोठी भेट वस्तू मिळाल्याची घटना घडली. हेरॉल्ड एम (वय 70) असे या वृद्ध आजोबांचे नाव असून ते नाताळची शॉपिंग करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक ते स्पा आणि कॅसिनोमध्ये गेले. तिथे त्यांनी लावलेल्या पैजेतून जवळपास 7 कोटींची रक्कम जिंकली.

 

पहिल्यांदा गेले होते कॅसिनोमध्ये
> हेरॉल्ड आपल्या आयुष्यात पहिल्यांदा कॅसिनोमध्ये गेले होते. कॅसिनोमध्ये असताना त्यांनी पोकरवर आपले नशिब आजमावल्याचे ठरवले.
> त्यानंतर त्यांनी पोकर खेळताना जवळपास 7 कोटींची पैज जिकंली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खेळण्यासाठी त्यांना फक्त 350 रुपये खर्च करावे लागले.
> हॉटेल मालकाने सांगितल्यानुसार, 15 वर्षांमध्ये पहिल्यांदा असे घडले की, किरकोळ रक्क्म लावून कोणी कोट्यावधींचे बक्षिस जिंकले. त्यानंतर कॅसिनोने ट्विट करुन हेरॉल्ड यांच्या जिंकण्याची माहिती शेअर केली होती.     
> तज्ज्ञांनुसार, पोकरमध्ये 2 कोटी 3 लाख 48 हजार खेळाडूंपैकी दोनच खेळाडूंमध्ये फ्लशमध्ये टक्कर होण्याची शक्यता असते.

 

बातम्या आणखी आहेत...