आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 70 व्या वर्षी प्रेमात पडले आजोबा, नातवंडांनी केला विरोध तर गावकऱ्यांनी बदनाम; मग दोघांनी उचलले टोकाचे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात उतारवयात प्रेमात पडलेल्या जोडप्याचा करुण अंत झाला आहे. 70 वर्षांचे नत्थू 50 वर्षांची महिला तारा हिच्या प्रेमात पडले होते. या नात्याला तिचाही होकार होता. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा कुटुंबातच नव्हे, तर अख्ख्या गावात होत्या. परंतु, नत्थू आणि तारा यांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला. दोघांनी एकाचवेळी एकाच ठिकाणी विष घेतले. यानंतर नत्थूची प्रेयसी तारा हिचा जागीच मृत्यू झाला. तर नत्थूला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 


नातवंडांनी केला विरोध, तर गावकऱ्यांनी बदनाम...
नत्थू आपल्या पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते. घरात मुलगा किंवा सुना फारसे लक्ष देत नव्हते. काही वर्षांपूर्वीच ते गावात राहणाऱ्या ताराच्या संपर्कात आले. ती देखील आयुष्यात एकाकी होती. त्यामुळे काही दिवसांतच चांगली मैत्री झाली आणि मने जुळली. त्यांनी एकत्रित राहून एकमेकांना आधार देण्याचा निर्णय घेतला. नत्थूने ही गोष्ट आपल्या घरात नातवंडांना सांगितली. परंतु, त्याच्या वयाचा दाखला देत मुलांनी आणि नातवंडांनी भरपूर सुनावले. एवढेच नव्हे, तर या घटनेनंतर गावात दोघांच्या अफेअरच्या चर्चा देखील उडाल्या. आपल्या आजोबांच्या नावाने अशा प्रकारच्या चर्चा उडत असल्याचे ऐकूण नातवंडे त्यांना राग-राग करत होते. सोबतच गावकऱ्यांचे टोमणे देखील ऐकावे लागत होते. ताराची गत याहून वाइट होती. गावकऱ्यांनी तिची कुप्रसिद्धी सुरू केली. या बदनामी आणि तिरस्काराला दोघांनी कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तारा जग सोडून गेली आणि नत्थू अजुनही रुग्णालयात उपचार घेताना आपल्या नशीबाला दोष देत आहे.

बातम्या आणखी आहेत...