आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 7,000 Crore Scam In Banks, CBI Raids 169 Places Across India, Including Maharashtra

बँकांमधील 7 हजार कोटींचा घोटाळा, सीबीआयचे महाराष्ट्रसह देशभरात 169 ठिकाणी छापे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन(सीबीआय)ने बँकांमधील 7000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी 35 केस दाखल केले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात 169 ठिकाणी आज(मंगळवार) छापेमारी करण्यात आली. सीबीआईने आंध्रप्रदेश, चंडीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरल, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, तेलंगाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादर आणि नगर हवेलीमध्ये ही कारवाई केली.या कारवाईत सीबीआयने आक्षेपार्ह कागदपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागदपत्र जप्त केली आहेत. बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईक आणि संबंधीत लोकांना मोठ-मोठी कर्ज वाटायची आणि ती नंतर भरायचीच नाही, असा उद्योग अनेक ठिकाणी सुरू होता. दरमयान, ही कारवाई कोणत्या बँकांमध्ये झाली, आणि आरोपींची नावे अद्याप समोर आलेली नाहीयेत. सीबीआयने या प्रकारच्या घटनांमध्ये अनेकवेळा तपास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...