आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या वयापेक्षा 40 वर्षे लहान दिसते ही महिला, या वयातही आठवड्यातून 6 दिवस करते काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क. अमेरिकेची मॉडल सुसास लूसी आपल्या लूकने सर्वांच्या डोळ्यात धुळफेक करतेय. वयाच्या 71 व्या वर्षीही ती 40 वर्षे लहान दिसतेय आणि ती स्विमसूटमध्ये पोज देत आहे. तिने हे फोटोशूट हार्पर्स बाजारच्या अक्टोबर एडिशनसाठी केले आहे. या फोटोशूटमध्ये तिची सुंदरता आणि फिटनेस पाहून लोक चकीत आहेत. ती या वयातही आठवड्यातून 6 दिवस काम करते. तिने आपल्या फिटनेसविषयी अनेक सीक्रेट शेअर केले आहेत.


आठवड्यातून 6 दिवस करते काम 
- या मॅगझीनसाठी फोटोशूट केल्यानंतर सुसान म्हणाली की, हे शूट केल्यानंतर मला खुप छान फिल होतेय. मला माझ्या 20 आणि 30 च्या दशकात वाटत होते तसेच मला फिल होतेय.
- तिने सांगितले की, लोक मला पाहतात तेव्हा ते म्हणतात की, तु अजिबात म्हातारी दिसत नाही, परंतू मी खरोखर वयाने म्हातारी आहे.
- सुसाननुसार, जर तुम्ही सुंदर आणि आतून मजबूत असाल तर तुमचे वय काय याचा काहीच परिणाम होत नाही. आपल्या फिटनेसचे क्रेडिट ती अनेक गोष्टींना देते.
- सुसानने वुमन हेल्थ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती अजुनही आठवड्यातून 6 दिवस काम करते आणि फक्त एक दिवस ऑफ घेते, कारण ही तिची गरज आहे. 


शेअर केले फिटनेस सीक्रेट 
- सुसानने आपल्या डेली रुटीनविषयी बोलताना सांगितले की, ती रोज सकाळी वर्क आउट करते आणि हे कधीच मिस करत नाही. यासोबतच ती एक्सरसाइजसोबत डान्सही करते.
- ती जेवताना खुप सतर्क राहते आणि आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवते. तिने चीज, बर्गर आणि फ्रेंच फ्राइज कधी खाल्ले हे तिला आठवतही नाही.
- सुसाननुसार, ती कधी तरी डेजर्ट घेते. तर स्नॅक्समध्ये काहीच घेत नाही. ब्रेड आणि पास्तासुध्दा कधीतरी घेते.
- तिला सँडविच खुप आवडते. परंतू हेही ती ब्रेडऐवजी फक्त बटाटे आणि प्रोटीनसोबत घेते. तर वाइनचा फक्त एक क्लास घेते.

 

 

बातम्या आणखी आहेत...